दिलासादायक! IMA ने सुरु केली कोविड हेल्पलाईन, मिळणार 24 तास मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : देशाभरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच कोरोनाग्रस्त आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने 24 तास सेवा देणारी कोरोना ग्रस्तांसाठीची एक हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात कोरोना संदर्भातील मदत मिळणार आहे.

कोरोनाबाबत मदत करण्यासाठी या हेल्पलाइन अंतर्गत 250 डॉक्टरांचा स्टाफ काम करीत आहे. याबाबत बोलताना डॉ. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ जयलाल यांनी सांगितले की,95975757454 या नंबर वर हेल्पलाईन जारी केली आहे. या नंबर वर फोन करून करून कोरोनाबाबत बाबत माहिती आणि मदत दोन्ही 24 तास मिळू शकते. देशभरातील नागरिक याचा लाभ घेऊ शकतात.

याबाबत केली जाणार मदत

-या हेल्पलाइनच्या माध्यमातून रुग्णालयांमधील कोरोना बेडपासून व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची (ICU Beds) सुविधा याबाबत माहिती मिळेल.

-सेल्फ किंवा होम क्वारंटाईनच्या (Home Quarantine) वेळी घ्यावयाची काळजी

-कोरोना झाल्यास घरीच करायचे उपाय

-लसीबद्दलची जागरुकता

-छोट्या घरांमध्ये रुग्ण आणि कुटुंबीयांनी घ्यावयाची काळजी

अशाप्रकारच्या लोकांच्या अनेक शंकांचं निराकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. दरम्यान एका दिवसात देशभरात दोन लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात एक हजारहून अधिक व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment