Indian Merchant Navy Bharti | भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये 4000 पदांसाठी बंपर भरती!! पात्रता फक्त 10वी पास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुमचे जर दहावी तसेच बारावीपर्यंत शिक्षण झाले असेल आणि अजूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल. तर आज आम्ही तुमच्यासाठी एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता दहावी आणि बारावीपर्यंत शिकलेल्या उमेदवारांना भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये (Indian Merchant Navy Bharti) नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत तब्बल 4000 रिक्त पदांची भरती होणार आहे. या भरतीमध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर भारतीय मर्चंट नेव्हीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. आता या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये (Indian Merchant Navy Bharti) विविध विभागामध्ये 4000 पदांची मेगा भरती होणार आहे. या भरती अंतर्गत डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सिमॅन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर / हेल्पर, मेसबॉय आणि कुक यांसारख्या विविध पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी त्यांनी अधिकृत सूचना देखील वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. 11 मार्च 2024 रोजी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 30 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज प्रक्रिया सुरू करा

महत्त्वाची माहिती

  • एकूण रिक्त पदे – 4 हजार पदे
  • शैक्षणिक पात्रता – 10 वी, 12 वी, आयटी पास
  • भरती करणारी संस्था – भारतीय मर्चंट नेव्ही
  • वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष
  • पदाचे नाव – डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सिमॅन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर / हेल्पर, मेसबॉय आणि कुक
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024.

रिक्त पदांचा तपशील | Indian Merchant Navy Bharti

  • डेक रेटिंग – 721 पदे
  • इंजिन रेटिंग – 236 पदे
  • सीमॅन – 1432 पदे
  • इलेक्ट्रिशियन – 408 पदे
  • वेल्डर/हेल्पर – 78 पदे
  • मेस बॉय – 922 पदे
  • कुक – 203 पदे

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.