कराडमध्ये विद्यार्थी काँग्रेसतर्फे जेएनयु हल्ल्याचा निषेध;संघ-भाजपवर केला तुफान हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जेएनयू विद्यार्थी हल्ल्याप्रकरणी देशभर या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. रविवारी काही तोंड झाकलेल्या गुंडांनी जेएनयूमधील विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली होती. या भ्याड हल्ल्याबाबत अनेक स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. यायचं भाग म्हणून आज काँग्रेस पक्षातर्फे कराडमध्ये निदर्शने करण्यात आली.

शहरातील दत्त चौकात रात्री उशीरा काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.अखिल भारतीय विदयार्थी कॉग्रेसचे प्रदेशअध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.केंद्र सरकारवरच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत निदर्शकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. या घटनेतील हल्लेखोरांना कठोर शासन करण्याची आंदोलकांनी मागणी केली.

Leave a Comment