Indian Navy Recruitment 2024 |ज्या विद्यार्थ्यांची पदवी पूर्ण झालेली आहे. आणि ते सध्या नोकरीच्या शोधात आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता भारतीय नौदल विभागात नोकरीची संधी आहे. ज्या तरुणांना देशसेवा करण्याची खूप इच्छा आहे. अशा तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे. केवळ पदवीधर असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळत आहे. भारतीय नौदल अंतर्गत तब्बल 254 जागा भरण्यासाठी रिक्त जागा निघालेल्या आहेत. आणि आता या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
भारतीय नौदलाने शॉर्ट सर्विस कमिशनच्या पदासाठी अधिसूचना देखील जारी केलेली आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जाऊन या अर्ज करू शकता 24 फेब्रुवारी पासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे l. आता या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती.
पदाचे नाव – एक्झिक्युटिव्ह आणि टेक्निकल ब्रांच
पदसंख्या – 254
रिक्त पदे | Indian Navy Recruitment 2024
- सामान्य सेवा – 50
- पायलट हवाई वाहतूक नेवल एअर ऑपरेशन्स – 46
- लॉजिस्टिक – 30
- नौदल सुधारणा -10
- शिक्षण – 18
- अभियांत्रिकी शाखा – 30
- विद्युत शाखा – 50
- नौदल कन्स्ट्रक्टर – 20
शैक्षणिक पात्रता
या भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवाराची बारावी B. Tech झाली असणे गरजेचे आहे. तसेच यामध्ये त्यांनी केवळ 60 टक्के गुण असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे भारतीय नौदलातील शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर या पदासाठी अर्ज करण्यासाठी बीएससी, बी कॉम, झालेले असणे गरजेचे आहे
वयोमर्यादा
18 ते 24 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे
अर्ज शुल्क
या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकरण्यात आलेले नाही
अर्ज करण्याची तारीख
24 फेब्रुवारी 2024 रोजी ही अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे तर 10 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
वेतन
उमेदवाराची निवड झाल्यास त्याला दर महिना 56 हजार 100 एवढे वेतन मिळणार आहे
अर्ज कसा करायचा
- या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे
- त्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला आवश्यक ते कागदपत्र जोडावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही हा अर्ज सबमिट करू शकता.