Small Savings Schemes : PPF, NPS, सुकन्या योजना खातेधारकांनो, 31 मार्चपूर्वी करा ‘हे’ काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Small Savings Schemes) जर तुम्ही छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.कारण वेगवेगळ्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे अशा योजना धारकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. चला तर जाणून घेऊयात काय आहे ही महत्वाची अपडेट?

.. तर दंड भरावा लागेल (Small Savings Schemes)

जर तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी किंवा PPF योजना, सुकन्या समृद्धी योजना आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मध्ये गुंतवणूक केली आहे, मात्र अजून आर्थिक वर्षात पैसे जमा केलेले नाहीत. तर तुमचे योजनेतील खाते सक्रिय ठेवण्यासाठी तुम्हाला ३१ मार्च २०२४ ही अंतिम मुदत प्रदान करण्यात आली आहे. या मुदतीदरम्यान जर तुम्ही किमान वार्षिक ठेव गुंतवणूक केलेल्या योजनेच्या खात्यात जमा करू शकला नाहीत तर तुमचे खाते फ्रीज केले जाईल. इतकेच नव्हे तर यासाठी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. शिवाय यातून करबचत देखील करता येणार नाही.

(Small Savings Schemes) PPF, NPS आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यांना सक्रिय ठेवण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात किमान रक्कम जमा करावी लागते. याचा थेट कराशीही संबंध असतो. दरम्यान या खाते धारकांना ही रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च २०२४ ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. नव्या कर प्रणालीनुसार, सरकारने १ एप्रिल २०२३ पासून आयकर स्लॅबमध्ये बदल केले आहेत. ज्यामुळे मूळ सूट मर्यादा २.५ लाख रुपयांवरून ३ लाख रुपये करण्यात आली आहे.

तसेच यात स्टँडर्ड डिडक्शनचाही समावेश आहे. परिणामी, ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावे लागत नाहीत. मात्र याआधीच PPF, SSY आणि NPS सारख्या योजनांमध्ये कर बचतीसाठी गुंतवणूक केली असेल किंवा नवीन कर प्रणाली स्विच केली असेल तर तुम्हाला या गुंतवणुकीवर कर लाभ मिळणार नाही. (Small Savings Schemes) त्यामुळे २०२३- २४ या आर्थिक वर्षासाठी या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची किंवा ठेव जमा करण्याची गरज नाही असा समज झाल्यास या योजनांच्या खात्यांमध्ये किमान रक्कम नसल्यास दंड आकारला जाऊ शकतो.

दंड टाळण्यासाठी किती किमान ठेव आवश्यक आहे?

1. सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी (PPF) सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी अर्थात PPF नियम २०१९ नुसार, प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या खात्यात किमान ५०० रुपये जमा करणे बंधनकारक आहे. मात्र कोणत्याही कारणामुळे खातेधारकाने ही रक्कम न भरल्यास त्याचे PPF खाते निष्क्रिय केले जाते. हे खाते पुन्हा सक्रिय करता येते. (Small Savings Schemes) मात्र त्याकरता खातेधारकाला प्रत्येक वर्षासाठी ५० रुपये डीफॉल्ट फी भरावी लागेल. ज्याची वार्षिक किमान रक्कम ५०० रुपये असेल.

2. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) – राष्ट्रीय पेन्शय प्रणाली अर्थात NPS खातेधारकांना प्रत्येक आर्थिक वर्षात किमान १,००० रुपये जमा करणे बंधनकारक आहे. असे न केल्यास गुंतवणूकदाराचे खाते फ्रीज केले जाते. हे खाते पुन्हा सुरु करता येते. मात्र यासाठी एकरकमी ठेव म्हणून किमान ५०० रुपये जमा करावे लागतात. तथापि, खाते सक्रिय ठेवण्यासाठी प्रति आर्थिक वर्षात किमान १,००० रुपये जमा करणे आवश्यक आहे.

3. सुकन्या समृद्धी योजना (SSY) – सुकन्या समृद्धी योजना अर्थात SSY योजनेसाठी प्रत्येक आर्थिक वर्षात किमान २५० रुपये जमा करणे बंधनकारक आहे. ही किमान रक्कम खात्यात जमा न केल्यास हे खाते डीफॉल्ट मानले जाते. योजनेचे खाते पुन्हा सक्रिय करता येते. (Small Savings Schemes) मात्र त्यासाठी डीफॉल्टच्या प्रत्येक वर्षासाठी ५० रुपये डीफॉल्ट शुल्क भरावे लागते. जे प्रत्येक वर्षाच्या डिफॉल्टसाठी किमान २५० रुपयांसह भरावे लागतात.