हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Navy Recruitment 2025 । देशातील प्रत्येकाला आपण देशासाठी काहीतरी करावे अस वाटत असते. यासाठी कोण समाजसेवा करतो, तर कोण पोलीस खात्यात काम करतो, तर कोणी देशाच्या सैन्यदलात भरती होतो. प्रत्येकजण आपाआपल्या पद्धतीने देशाची सेवा करण्याचे काम करत असतो… अशीच एक सुवर्ण संधी दहावी पास झालेल्या विध्यार्थांना आली आहे. भारतीय हवाई दलात अग्नीवीर पदांसाठी भरती चालू आहे. ज्यांना देशासाठी काम करायेचे आहे त्यांना हि सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. इंडियन नेव्हीमध्ये अग्निवीर एमआर म्यूजिशियन पदांसाठी भरती होणार आहे… त्यासाठी पात्रता काय आहे? अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊयात.
उमेदवारासाठी निकष काय असतील–
अग्निवीर एमआर संगीतकार पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी भारतातील मान्यताप्राप्त मंडळातून ५० टक्के गुणांसह १०वी उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संगीतात प्रवीणता आणि क्षमता असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये उमेदवाराला गती, लय आणि वेगासह संपूर्ण गाणे गाऊ शकले पाहिजे. त्यानंतर फिटनेस टेस्ट, संगीत क्षमता टेस्ट आणि मेडिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
पगार किती? Indian Navy Recruitment 2025
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३०,००० रुपये वेतन दिले जाईल. तसेच इतर सुविधाही दिल्या जातील.
अर्ज कसा करावा–
इंडियन नेव्हीमधील या नोकरीसाठी (Indian Navy Recruitment 2025) अधीसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया अजून सुरु झालेली नाही.येत्या ५ जुलै २०२५ पासून हि अर्जप्रक्रिया सुरु होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२५ आहे.जे विध्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत ते विध्यार्थांनी वरील दिलेल्या या वेबसाईट वरती अर्ज करू शकतात.
कशी होणार निवड?
अग्निवीर एमआर संगीतकार पदासाठी (Indian Navy Recruitment 2025) उमेदवारांचे मूल्यांकन शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT), संगीत क्षमता चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केले जाईल. शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (पीएफटी) आणि संगीत क्षमता चाचणीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. यामध्ये पुरुष उमेदवारांना अवघ्या ६ मिनिटे ३० सेकंदात १.६ किलोमीटर अंतर धावावे लागेल. तर महिला उमेदवारांना हेच अंतर ८ मिनिटांत पूर्ण करावे लागेल. याशिवाय, पुरुष उमेदवारांना २० स्क्वॅट्स आणि महिला उमेदवारांना १५ स्क्वॅट्स पूर्ण करावे लागतील. तसेच, पुरुष उमेदवारांना १५ पुश-अप्स आणि महिला उमेदवारांना १० पुश-अप्स मारावे लागतील.




