भारताचा चीनला आणखी एक मोठा धक्का ! आता तेल कंपन्या चिनी जहाज आणि टँकरवर आणणार बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावामुळे आणि चीनशी बिघडत चाललेल्या संबंधांदरम्यान, मोठ्या भारतीय तेल कंपन्यांनी आपले कच्चे तेल आणि पेट्रोलियम पदार्थ आणण्यासाठी तसेच वाहतूक करण्यासाठी चिनी जहाजाच्या वापरावर बंदी आणली आहे. भारतीय तेल कंपन्यांचे म्हणणे आहे की ते थर्ड पार्टी ने ही रजिस्टर केले असले तरीही ते कच्चे तेल आयात करण्यासाठी किंवा डिझेल निर्यात करण्यासाठी चीनच्या मालकीचे कोणतेही तेल टँकर किंवा जहाज वापरणार नाहीत. यापुढे असे करणार्‍या थर्ड पार्टीच्या कंपन्यांना ब्लॅक लिस्ट केले जाईल.

भारतीय तेल कंपन्यांनी असा निर्णय घेतला आहे की देशातील तेल आयात आणि निर्यात करण्याच्या बोली प्रक्रियेवर चिनी जहाजांवर बंदी घातली जाईल. या कंपन्यांनी ओपेक देशांसह जगभरातील तेल व्यापाऱ्यांना स्पष्ट केले आहे की, कोणत्याही चिनी जहाजातून भारतात तेल पाठवू नये. मात्र, तेल कंपन्यांच्या या हालचालीचा तेल व्यवसायावर कोणताही नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाही, कारण चीनी जहाजांचा तेल टँकर व्यवसायात कमी हिस्सा आहे. मात्र तेल कंपन्यांच्या या हालचालीमुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध आणखीनच ताणले जातील.

व्यवसायावर परिणाम होणार नाही
या प्रकरणाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, भारतात येणारे बहुतेक विदेशी तेल टँकर हे लायबेरिया, पनामा आणि मॉरिशसमधील कंपन्यांचे आहेत. या व्यवसायात चीनचा वाटा नगण्य आहे, त्यामुळे भारताच्या तेल व्यापार आणि तेल कंपन्यांना याचा परिणाम होणार नाही. ते म्हणाले की चिनी जहाजांचा वापर मर्यादित आहे आणि बहुधा ते द्रव पेट्रोलियम गॅसच्या (एलपीजी) वाहतुकीसाठी वापरले जातात. मात्र , इंडियन ऑईल लिमिटेड (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांनी अद्यापही या विषयावर कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment