विशेष प्रतिनिधी । देशातील सर्वात मोठी सरकारी तेल पुरवठा करणाऱ्या दिला आहे की, जर १८ ऑक्टोबरपर्यंत थकबाकी जमा केले नाही तर ६ मुख्य विमानतळावरील इंधन पुरवठा बंद केला जाईल. अशा परिस्थितीत जर खरच इंडियन ऑईल कार्पोरेशनने इंधन पुरवठा बंद केला तर एअर इंडियाची विमाने उड्डाण कशी करणार हा प्रश्न आहे. एअर इंडियाने प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपये देण्याची अट पाळली नाही. याआधी २२ ऑगस्ट रोजी कोच्ची, मोहाली, पुणे, पाटणा, रांची आणि विशाखापट्टनम या सहा विमानतळावरील एअर इंडियाच्या विमानांसाठी इंधन पुरवठा बंद करण्यात आला होता.
पण त्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर ७ सप्टेंबरपासून इंधन पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला होता. या सर्व प्रकरणामुळे एअर इंडियाने प्रवास करणाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. कारण जर पैसे दिले गेले नाही तर कोणत्याही क्षणी इंधन पुरवठा बंद होऊ सकतो आणि विमान रद्द होऊ शकते. यासंदर्भात गेल्याच आठवड्यात बीपीसीएल आणि एचपीसीएल या दोन कंपन्यांनी एअर इंडियाला पत्र लिहून पैसे देण्यास सांगितले होते. या दोन्ही कंपन्यांनी एअर इंडियाला ५ ऑक्टोबर रोजी सांगितले होते की जर पैसे दिले नाही तर ११ ऑक्टोबरपासून इंधन पुरवठा बंद केला जाईल.
इंधनापोटी एअर इंडियाने ५ हजार कोटी थकबाकी ठेवली आहे. गेल्या आठ महिन्यापासून ही धकबाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. आठ महीन्यांपूर्वी मिळालेल्या इंधनाचे पैसे एअर इंडियाकडून आता दिले जात आहेत. इंधन पुरवठा सुरळीत हवा असल्यास एअर इंडियाला १८ ऑक्टोबरपर्यंत धकबाकी जमा करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी एअर इंडियाने इंधन पुरवठा करणाऱ्या तिन्ही कंपन्यांना विनंती केली आहे की पुरवठा बंद करू नये. अर्थात असे असले तरी एअर इंडियाने धकबाकी कधीपर्यंत दिली जाईल याबाबत कोणतीही ठोस तारीख दिलेली नाही. त्यामुळेच इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी १८ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिली आहे.