इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये 200 पदांसाठी भरती; 12वी पास उमेदवारांना मिळणार नोकरीची संधी

Indian Oil Corporation
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील अग्रगण्य तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (INDIAN OIL CORPORATION LIMITED) मध्ये तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी(Job Requirement) उपलब्ध झाली आहे. इंडियन ऑइलकडून १२वी पास, डिप्लोमा तसेच ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी 200 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार iocl.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

भरती प्रक्रिया आणि पदसंख्या

ही भरती मार्केटिंग डिव्हिजनसाठी होणार असून ती नॉर्थन रीजनमध्ये केली जाणार आहे. या भरती अंतर्गत दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, चंदीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये उमेदवारांची निवड केली जाईल. तसेच या भरतीत टेक्नीशियन, ट्रेड अप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस अशा विविध पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

टेक्नीशियन अप्रेंटिस – संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा धारक उमेदवार पात्र

ट्रेड अप्रेंटिस – ITI उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात

ग्रॅज्युएट अप्रेंटिस – BBA, BA, B.Com, B.Sc पदवीधारक उमेदवार पात्र

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षे दरम्यान असावे.

अर्ज कसा कराल

सर्वप्रथम iocl.com या अधिकृत वेबसाइटवर जा.

Career सेक्शनमध्ये जाऊन संबंधित भरतीच्या लिंकवर क्लिक करा.

नवीन उमेदवारांनी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी.

अकाउंटमध्ये लॉगिन करून अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

  1. फॉर्म सबमिट करून भविष्यासाठी प्रिंटआउट काढा.

दरम्यान, इंडियन ऑइलमध्ये अप्रेंटिसशिप काम केल्यानंतर उमेदवारांना एक चांगला अनुभव मिळणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम ठरू शकते. जे उमेदवार या पदांसाठी इच्छुक आहेत त्यांनी त्वरित आपले अर्ज दाखल करावेत.