भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांना मिळाली महत्त्वाची जबाबदारी, IMF मध्ये निभावणार सर्वोच्च नेतृत्वाची भूमिका

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय नाणेनिधी-IMF च्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ लवकरच आणखी एका प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांना प्रमोशन देण्यात आले असून आता त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर असतील. गीता जेफ्री ओकामोटोची जागा घेणार आहे. गीता गोपीनाथ 21 जानेवारी 2022 पासून या पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सांगण्यात आले की,”ओकामोटा लवकरच आपले पद सोडतील, त्यानंतर गीता गोपीनाथ त्यांच्या जागी पदभार स्वीकारतील. त्या सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे.” गीता गोपीनाथ या RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून नियुक्त झालेल्या दुसऱ्या भारतीय आहेत.

मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून काम केले
गीता गेल्या तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी IMF मधून बाहेर पडण्याविषयी सांगितले होते. त्यांना हार्वर्ड विद्यापीठात परत जाऊन शैक्षणिक काम करायचे आहे, असे त्यांनी सांगितले होते. मात्र आता त्यांना प्रमोशन देऊन फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर बनवण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जिओग्राव्हिया यांनी सांगितले की,”गीता गोपीनाथ या पहिल्या महिला मुख्य अर्थशास्त्रज्ञ होत्या, आता त्या त्यांची सर्व्हिस सुरूच ठेवतील आणि फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करतील.”

गीता दिल्ली विद्यापीठातून पदवीधर आहेत
गीता गोपीनाथ यांचा जन्म 1971 मध्ये भारतातील म्हैसूर शहरात झाला. त्यांचे वडील टी.व्ही. गोपीनाथ हे केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील शेतकरी आणि उद्योजक आहेत. गीता यांनी 1992 मध्ये दिल्ली विद्यापीठातून बॅचलरची पदवी मिळवली आणि त्यानंतर वॉशिंग्टन विद्यापीठातून एमए केले. गीता यांनी 2001 मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. गीता यांचे पती इक्बाल धालीवाल हे देखील अर्थशास्त्रातील पदवीधर आहेत. ते 1995 च्या बॅचचे IAS टॉपर होते. इक्बाल IAS ची नोकरी सोडून प्रिन्स्टनमध्ये शिकण्यासाठी गेले. गीता आपले पती आणि मुलासोबत केंब्रिजमध्ये राहतात.

दिल्ली ते IMF गीता यांचा असा प्रवास
गोपीनाथ यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर गीताने वॉशिंग्टन विद्यापीठातून एमए केले. प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएचडी केल्यानंतर त्यांनी शिकागो विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. त्या नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चमध्ये आंतरराष्ट्रीय वित्त आणि मॅक्रोइकॉनॉमिक्स प्रोग्रामच्या सह-संचालक देखील आहेत. त्या अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यूच्या सहसंपादक, हँडबुक ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सच्या सहसंपादक आणि रिव्ह्यू ऑफ इकॉनॉमिक स्टडीजच्या संपादक देखील आहेत.

गीता एक उत्तम अर्थतज्ज्ञ आहे
गीता गोपीनाथ यांची गणना जगातील आघाडीच्या अर्थतज्ज्ञांमध्ये केली जाते. आंतरराष्ट्रीय फायनान्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सवरील संशोधनासाठीही त्या ओळखल्या जातात. 2019 मध्ये त्यांना प्रवासी भारतीय सन्मान देण्यात आला. ती 2019 पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम करत आहे.