हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंडच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची काल निवड करण्यात आली असतानाच आता एक खळबळजनक गोष्ट समोर येत आहे. भारतीय संघात निवड झालेला जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे.
आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णनने चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर त्याची भारतीय संघातही निवड करण्यात आली होती. पण आता त्याला करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आता प्रसिधला काही दिवस उपाचर घ्यावे लागतील आणि त्याला क्वारंटाइनही व्हावे लागणार आहे.
KKR and India pacer Prasidh Krishna tests COVID-19 positive
Read @ANI Story | https://t.co/14JVdbRRSM pic.twitter.com/AtvTHVKOjd
— ANI Digital (@ani_digital) May 8, 2021
भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यात पाच कसोटी सामने खेळणार आहे. पण त्यापूर्वी त्यांना अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी खेळावी लागणार आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.