हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक मोठ्या कंपन्यांमधून आजकाल कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जात आहे. अशा अनेक बातम्या सध्या पसरत आहेत. जर कंपन्यांना एखाद्या कर्मचारी त्यांच्या कामावर नको असेल, तर ते त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देऊन राजीनामा देण्यासाठी भाग पाडतात. किंवा ते स्वतः त्यांना काढून टाकतात. परंतु कर्मचारी देखील त्यांचा महिन्याचा खर्च भागवण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यासाठी अतिरिक्त काम करायला तयार होतात. परंतु काम टिकवण्याच्या नादात ते खूप काम करतात आणि याचा त्यांच्या आरोग्यावर मात्र विपरीत परिणाम होतो.
नुकतेच पुण्यात एक विचित्र घटना घडली. ती म्हणजे एका कंनीच्या कंपनीत चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या एका 26 वर्ष महिलेचा मृत्यू झाला आहे. आणि तिच्या आईने कंपनीला एक पत्र लिहून कामाच्या दबावामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे, असे देखील सांगितले आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झालेली आहे. आणि कर्मचारी हे किती तास काम करतात. या सगळ्या गोष्टींची देखील माहिती घेतली जात आहे. अशातच आयलो म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा एक मोठा रिपोर्ट समोर आलेला आहे. या रिपोर्टमध्ये अनेक देशांत कामाचे तास किती आहेत याची संपूर्ण माहिती घेण्यात आलेली आहे.
जेव्हा आपण कोणत्याही कंपनीत काम करतो. तेव्हा कामाचे दिवसाचे तास हे फिक्स असतात. जवळपास आठ ते दहा तास हे काम केले जाते . पण कामाच्या व्यतिरिक्त अनेक वेळा माणसे जास्त वेळ काम करतात. कधी कधी घरी गेल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी देखील त्याला काम करावे लागते.अनेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे उरलेल्या सदस्यांवर मात्र कामाचा मोठा दबाव येत आहे. आणि यामुळे अतिरिक्त काम करतात आणि त्यांच्या आरोग्यावर देखील तसा परिणाम होतो.
जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचा विचार केला तर भारतात कामाचे तास हे खूप जास्त आहेत. भारतीयांच्या कामाचे तास हे अमेरिका, जपान, चीन, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, ब्राझील या देशांपेक्षा जास्त आहे. दर आठवड्याला आता हे या देशातील कर्मचारी ऑफिसमध्ये किती काम करतात ते जाणून घेऊयात.
भारतातील लोक हे एका आठवड्यात जवळपास 46.7 तास काम करतात.चीनमधील लोक एका आठवड्यात 46.1 तास काम करतात. ब्राझील मधील लोक हे दर आठवड्यात 39 तास काम करतात. त्याला अमेरिकेतील लोक 38 तास काम करतात. जपान मधील लोकांची आठवड्याला काम करण्याची क्षमता ही 36.6 तासांची आहे. तर इटली मधील एका आठवड्यात 36.3 तास काम करतात. युकेमधील डोके 35.9 तास काम करतात. फ्रान्समधील 35.9 तास काम करतात. त्याचप्रमाणे कॅनडामधील लोक एका आठवड्यामध्ये 32.1 तास काम करतात. या सगळ्या आकडेवारीवरून असे लक्षात आलेली आहे की, भारतातील लोक या आठवड्याला सगळ्यात जास्त काम करतात. आणि याचाच विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. आणि त्यांना वेगवेगळ्या शारीरिक व्याधीना सामोरे जावे लागत आहे.