देशी बनावटीचे पिस्तुल विक्री करणाऱ्या परराज्यातील इसमास केली अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

सांगलीतील संजयनगर येथे देशी बनावटीचे बेकायदा विना परवाना पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या राजस्थान येथील दिनेश कुमार चौधरी याच्या आज गुंडा विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे असा एक लाख ११ हजारांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला आहे. चौधरी याच्यावर अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

संजयनगर परिसरात असणाऱ्या लव्हली सर्कल येथे एक व्यक्ती बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे पोलीस नाईक वैभव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार आज गुंडा विरोधी पथकाने लव्हली सर्कल येथे सापळा रचला असता. दिनेशकुमार चौधरी हा संशयित रित्या परिसरात कोणाची तरी वाट पाहत असल्याचे निदर्शनास आले.
पथकाने त्याला शिताफीने पकडून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि काडतुसे विक्रीसाठी आणली असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला ताब्यात घेत संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तो रास्थान मधला रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो सांगलीमध्ये कोणाला पिस्टल विकण्यासाठी आला होता? याचा तपास आता पोलीस करत आहेत. दरम्यान दिनेशकुमार चौधरी यांच्याकडून परंपराज्यातील पिस्टल खपवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. त्यादिशेने आता पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Leave a Comment