हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशभर विविध राज्यांमध्ये शाखा असलेल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) नोकरीसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या बँकेने नुकतीच एकूण ५१ पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर केली आहे. इच्छुकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. लक्षात घ्या की, या भरतीसाठी १ मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च आहे.
अर्ज प्रक्रिया आणि पात्रता
इच्छुक उमेदवारांना IPPB च्या अधिकृत संकेतस्थळावर (ippbonline.com) जाऊन अर्ज भरावा लागेल. या भरतीसाठी इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज प्रक्रियेसाठी अर्जदारांचे वय १ फेब्रुवारी पर्यंत किमान २१ आणि कमाल ३५ वर्षे असावे. तसेच, उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतात. या रिक्त पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
रिक्त पदांची माहिती
EWS (आर्थिक दुर्बल घटक) – ३ पदे
OBC (इतर मागासवर्ग) – १९ पदे
SC (अनुसूचित जाती) – १२ पदे
ST (अनुसूचित जमाती) – ४ पदे
निवड प्रक्रिया कशी असेल?
इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना पदवी परीक्षेतील गुण अचूक भरावेत. निवडीच्या प्रक्रियेत दोन किंवा अधिक उमेदवारांचे समान गुण असल्यास, त्यांच्या जन्मतारखेचा विचार केला जाईल. मेरिट लिस्टनुसार निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल.
पगार आणि नोकरीचे स्वरूप
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३०,००० रुपये वेतन दिले जाईल. सुरुवातीला उमेदवारांना १ वर्षासाठी कंत्राटी नोकरी दिली जाईल, परंतु कामगिरी समाधानकारक असल्यास २ वर्षांनी मुदतवाढ मिळू शकते. एकूण ३ वर्षे कंत्राटी स्वरूपात काम करण्याची संधी येथे मिळेल.
अर्ज शुल्क किती?
SC/ST/PWD उमेदवारांसाठी – १५०
इतर सर्व उमेदवारांसाठी – ७५०