Indian Post Recruitment 2023| तुम्ही जर सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर आता तुमचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकणार आहे. कारण की, इंडियन पोस्टने (India Post) तब्बल ३०,०४१ पदांकरिता मेगाभरती आणली आहे. यासाठी येत्या ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये दहावी पास असणारे इच्छुक उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमुळे इच्छुकांना थेट इंडियन पोस्टमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे उशीर करू नका.
इंडियन पोस्टकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पदासाठी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि मुलाखत घेण्यात येईल. अशा दोन टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला पदावर रुजू करण्यात येईल. यामध्ये प्राथमिक परीक्षेत पास झाल्यानंतरच उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. दोन्ही टप्प्यात पास झालेल्या उमेदवाराला ग्रामीण डाक सेवक (Rural Postal Servants) या पदावर नियुक्त केले जाईल.
10 वी पास उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात
या पदासाठी 10 वी पास उमेदवारही अर्ज करू शकतात. तसेच सदर उमेदवाराचे वय हे १८ ते ४० दरम्यान असावे अशी अट आहे. ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर अशा वेगवेगळ्या पदांसाठी इंडियन पोस्टकडून ही भरती प्रक्रिया (Indian Post Recruitment 2023) सुरू करण्यात आली आहे.
पगार किती ? Indian Post Recruitment 2023
महत्वाचे म्हणजे, उमेदवाराला सुरूवातीला मासिक वेतन १२ हजार रुपये देण्यात येईल. इच्छुक उमेदवार ग्रामीण डाक सेवक पदासाठी indiapostgdsonline.gov.in या इंडिया पोस्टाच्या या वेबसाइटवर अर्ज करू शकणार आहेत. येत्या २३ ऑगस्ट २०२३ पर्यंत इच्छुक उमेदवारांसाठी ही अर्ज प्रक्रिया सुरु राहील.
फी किती?
पोस्टाच्या या भरतीसाठी सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांना अर्जशुल्क 100 रुपये आकारले जात आहे. ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून उमेदवार अर्ज शुल्क भरू शकतो. यामध्ये, SC, ST, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांना या पदांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.