Wednesday, October 5, 2022

Buy now

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर; ‘या’ तारखेला सुरू होणार आयपीएलचा रनसंग्राम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या 2022 वेळापत्रक जवळपास अंतिम झालं आहे. आयपीएलच्या 15 व्या सीझनची सुरुवात 2 एप्रिलपासून सुरु होणार असल्याची माहिती आहे. यावेळी स्पर्धेत 10 टीम सहभागी होणार असून पहिला सामना चेन्नईमध्ये होणार आहे. परंतु चेन्नईचा सामना कोणाशी होईल हे मात्र अजून जाहीर करण्यात आले नाही.

दरम्यान, आगामी आयपीएल मध्ये १० टीम खेळणार असून त्यामुळे ६० ऐवजी ७४ सामने खेळले जाणार आहेत. प्रत्येक टीमला 14 मॅच खेळण्याची संधी असेल. त्यापैकी 7 मॅच होम ग्राऊंडवर तर उर्वरीत 7 मॅच दुसऱ्या टीमच्या ग्राऊंडवर होणार आहेत हा सिझन ६० दिवसांपेक्षा अधिक असेल असेही समजते. क्रीक बझच्या रिपोर्ट नुसार ही स्पर्धा २ एप्रिल रोजी सुरु होईल आणि अंतिम सामना ४ किंवा ५ जूनला खेळवला जाईल.

दरम्यान,या हंगामातील आयपीएलचे सर्व सामने भारतातच होणार असून भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. दोन नवीन संघ आल्यामुळे स्पर्धा अधिक रोमांचक होणार आहे. गत दोन वर्षी कोरोना मुळे आयपीएलचे आयोजन दुबईत केले होते.