Indian Railway : क्या बात …! भारतीय रेल्वेने दहा वर्षांत दररोज बांधले 7.41 किमी ट्रॅक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway : भारतीय रेल्वे नेटवर्क हे जागरभारातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतीय रेल्वे आता एवढ्यावरच थांबली नसून. ज्या भागात अद्याप ट्रेन पोहचली नाही तिथे देखील पोचण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रावाशांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहचवण्याखेरीज प्रवाशांना प्रवासाचा उत्तम आणि वेगवान अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणूनच रेल्वेचे हे जाळे आणखी वाढवण्याचे काम रेल्वे विभागाकडून केले जात आहे. त्याच संबंधीची माहिती आता समोर आली आहे.

भारतीय रेल्वेने गेल्या दहा वर्षांत दररोज सरासरी ७.४१ किमीचा रेल्वे ट्रॅक तयार केला आहे. यामध्ये नवीन रेल्वे रुळांचे बांधकाम तसेच सध्याच्या मार्गांचे दुहेरीकरण, गेज रूपांतरण यांचा समावेश आहे.अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने (Indian Railway) दिली आहे. माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आहे.

बांधले 27057.7 किलोमीटरचे रेल्वे ट्रॅक

रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दहा वर्षांत (2014-15 ते 2023-24) एकूण 27057.7 किलोमीटरचे रेल्वे ट्रॅक टाकण्यात आले आहेत. नवीन रेल्वे लाईन टाकण्यासोबतच त्यांच्या दुहेरी आणि तिप्पटीकरणाचाही (Indian Railway) यात समावेश आहे. यामध्ये या रेल्वे मार्गांचे मीटरगेजवरून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचाही समावेश आहे.

दररोज सरासरी 7.41 किमीचे ट्रॅक (Indian Railway)

याबाबात माहिती देताना मध्य प्रदेशचे याचिकाकर्ते चंद्रशेखर गौर यांनी सांगितले की, जेव्हा मी आकडे मोजले तेव्हा दहा वर्षांत दररोज बांधलेल्या रेल्वे ट्रॅकची सरासरी 7.41 किमी असल्याचे समोर आले. गौर म्हणाले की, लक्षणीय प्रगती असूनही, एकूण ट्रॅक टाकण्यात रेल्वेची गती कमी होत आहे. 2022-23 मध्ये 3901 किमीचा ट्रॅक बनवल्यानंतर 2023-24 मध्ये फक्त 2966 किमीचा ट्रॅक (Indian Railway) बनवण्यात आला जो फक्त 8.12 किमी प्रतिदिन आहे.

स्वित्झर्लंडच्या संपूर्ण रेल्वे नेटवर्कची बरोबरी

उल्लेखनीय आहे की, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत (Indian Railway) सांगितले होते की, भारतीय रेल्वे दररोज सुमारे 15 किमी नवीन रेल्वे ट्रॅक टाकते. वैष्णव यांनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी रेल्वे भवनात सांगितले होते की, गेल्या वर्षी 5200 किमीचे नवीन ट्रॅक तयार करण्यात आले होते जे स्वित्झर्लंडच्या संपूर्ण रेल्वे नेटवर्कच्या बरोबरीचे आहे. 2014 पासून दररोज चार किमी ट्रॅकसह, आम्ही आता दररोज 15 किमी नवीन ट्रॅक तयार करत आहोत.