Indian Railway : पैसे नसतानाही ‘या’ स्टेशनवरून करता येणार रेल्वेचा प्रवास ; काय आहे रेल्वेची खास सुविधा ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway : मंडळी तुमच्यासोबत कधी असे झाले आहे का ? की ट्रेनचे तिकीट काढण्यासाठी तुम्ही रांगेत उभे आहात आणि पैसे काढण्यासाठी खिशात हात घालतो तर काय ? पाकीट घरीच राहिलेले असते. अशावेळी मग कोणाकडून तरी उसने पैसे घेऊन तिकीट काढावे लागते. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? भारतातील एका रेल्वे स्टेशनने अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी एक चांगला (Indian Railway) निर्णय घेतला आहे. हे स्टेशन नेमके कोणते आहे ? आणि तुम्ही पैसे नसतानाही रेल्वेचा प्रवास कसा करू शकता चला जाणून घेऊया…

सध्याचा जमाना डीजिटलायझेशनचा आहे. या जमान्यात पैशांचे व्यवहार सुद्धा डिजिटल स्वरूपात होतात. रेल्वेने देखील हेच डिजिटल इंडिया चे व्हीजन डोळ्यासमोर ठेऊन आग्रा विभागाने ही विशेष सुविधा आग्रा कॅन्टोन्मेंट (Indian Railway) स्टेशनवर सुरू केली आहे.कॅशलेस पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी, QR कोडद्वारे अनारक्षित तिकिटे आणि प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करण्याची सुविधा प्रवाशांना देण्यात आली आहे.ही सुविधा एका विशेष कॅश लेस काउंटरद्वारे दिली जात आहे, जिथे क्यूआर कोड स्कॅनरसह प्रवासी त्यांचे भाडे स्क्रीनवर पाहू शकतात आणि ऑनलाइन पेमेंट करू शकतात. त्यामुळे रेल्वे आणि प्रवाशांमधला व्यवहार अधिक पारदर्शक पणे व्हायला मदत होते.

एवढेच नाही तर तुम्ही आग्रा विभागातील सर्व स्थानकांवर (आग्रा कॅन्टोन्मेंट, आग्रा फोर्ट, मथुरा जंक्शन इ.) खाद्यपदार्थ खरेदी करून QR कोडद्वारे कॅशलेस पेमेंट करू शकता. याशिवाय पार्किंग सुविधेसाठी क्यूआर कोडद्वारे कॅशलेस (Indian Railway) पद्धतीने पेमेंटही करता येते. जर प्रवाशांनी पे आणि युज टॉयलेटचा वापर केला तर ते कॅशलेस पेमेंटद्वारेही पैसे देऊ शकतात.

कॅशलेस पेमेंटमुळे प्रवाशांचा (Indian Railway) वेळ वाचेल आणि पैसे बदलण्याचा कोणताही त्रास होणार नाही. स्मार्ट फोनच्या वाढत्या उपलब्धतेमुळे, QR कोड / UPI पेमेंट प्रत्येकासाठी सुलभ आणि सुलभ झाले आहे. आगामी काळात अशी सोय सर्व रेल्वे स्टेशनवर सुरु होईल का ? ज्यामुळे प्रवाशांचा वाचेल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.