जनता कर्फ्यू : रेल्वेने केल्या तब्बल ३,७०० गाड्या रद्द तर गो एअर, इंडिगोनेही घेतला ‘हा’ निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नावे केलेल्या भाषणात रविवारी, २२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या १४ तासांच्या जनता कर्फ्यूचे हा कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी सर्वस्थरांतून प्रतिसाद मिळत आहे. रेल्वेने रविवारी देशभरातील जवळपास ३,७०० रेल्वेगाड्या रद्द केल्यानंतर आता देशातील इंडिगो आणि गोएअर या मोठ्या कंपन्यांनीही जवळपास तब्बल १ हजार उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

२२ मार्चला रविवार सकाळी ७ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूच्या दरम्यान नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर रेल्वेने गाड्या रद्द करण्याची घोषणा केली. रेल्वेने केलेल्या घोषणेनुसार, रविवारी रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये २४०० पॅसेंजर तर, १३०० लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. रविवारी पहाटे ४ ते रात्री १० या काळात या रेल्वे बंद राहणार आहेत. रेल्वेच्या सर्व विभागांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यानंतर इंडिगो आणि गो-एअर या दोन विमान कंपन्याही जनता कर्फ्यूच्या समर्थनार्थ समोर आल्या आहेत. गोएअरने रविवारी आपली देशातील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. तर इंडिगोने केवळ ६० टक्के उड्डाणे करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांची मिळून अंदाजे १००० उड्डाणे रद्द झाली आहेत. मात्र, या कंपन्यांनी रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांच्या तिकिटाचे पैसे प्रवाशांना परत करण्यासंदर्भात कसलेही भाष्य केलेले नाही.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment