करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या रेल्वे तिकिटांवरील सवलती बंद केल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने याबाबत मोठा निर्णय घेत सर्व कॅटेगरीतील रेल्वे तिकिटांवरील सवलती पूर्णपणे बंद केल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना मिळणारी सवलत, दिव्यांगजनांच्या ४ श्रेणी आणि ११ प्रकारच्या रूग्णांना मिळणाऱ्या रेल्वे तिकिटावरील सवलती कायम ठेवल्या आहेत. करोना संसर्गाच्या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील सूचना येईपर्यंत रेल्वे तिकिटावरील सवलत दिली जाणार नाही. यापूर्वी रेल्वेने देशातील २५० रेल्वे स्थानकांवर मिळणार्‍या प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत १० रुपयांवरून ५० रुपयांवर केली आहे.

रेल्वे तिकिटावरील अनुदान राहणार कायम
रेल्वेच्या तिकिटांवरील अनुदान कायम राहणार असून रेल्वेने सर्व झोनच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात नोटीस बजावली आहे. या निर्णयामध्ये केवळ रेल्वे तिकिटांवरील सवलती रद्द केल्या आहेत. सध्या ५३ कॅटेगरीत रेल्वे तिकिटात सूट मिळते, त्यापैकी ही सूट केवळ ३८ कॅटेगरीतच सूट दिली जाणार आहे. याशिवाय उर्वरित ३८ कॅटेगरीतील सूट काही काळासाठी रद्द केली आहे.

रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, केंद्र सरकारने जरी केलेल्या हेल्थ एडवाइजरीनुसार लोकांना प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळं रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी तिकिटावरील सवलती रद्द करण्याची नोटिस काढली आहे. या नोटीसनुसार हा दिनांक २० मार्च २०२० आणि त्यापुढील आरक्षित केल्या जाणारी तिकिटांवर कुठलीही सवलत मिळणार नाही आहे. रेल्वेकडून पुढील सूचना येईपर्यंत हा नियम लागू राहणार आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment