Indian Railway : खुशखबर ! होळीसाठी मध्यरेल्वे चालवणार 28 विशेष गाड्या ; जाणून घ्या वेळापत्रक

0
1
indian railway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway : महाराष्ट्रासह अवघ्या देशभरामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यासाठी अनेक जण आपल्या गावी जात असतात आणि म्हणूनच रेल्वेने देखील अशा प्रवाशांची चांगली सोय करून दिली आहे. होळीसाठी होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे कडून 28विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात या गाड्या मुंबईवरून (Indian Railway) सुटणार आहेत. मुंबईवरून या गाड्या महाराष्ट्राच्या इतर भागात धावतील. चला जाणून घेऊया याबद्दल…

या विशेष रेल्वे गाड्या 9 मार्च ते 21 मार्च या कालावधीमध्ये चालवल्या जाणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सी एस एम टी वरून नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे – नागपूर दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. या अतिरिक्त गाड्यांमुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आता रेल्वेच्या वेटिंग लिस्ट मध्ये तात्कळत (Indian Railway) थांबण्याची गरज नाही

कसे असेल वेळापत्रक (Indian Railway)

सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी

सीएसएमटीवरून २ दिवस धावेल (रविवार आणि मंगळवार) ८ सेवा, नागपूरसाठी दिनांक 9, 11, 16 आणि 18 रोजी रात्री 12.20 वाजता सुटेल आणि नागपूरवरून सीएसएमटीसाठी 9, 11, 16 आणि 18 मार्च रोजी रात्री 8 वाजता सुटेल आणि 1.30 वाजता पोहोचेल. तर थांबे दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा असतील.

सीएसएमटी मडगाव सीएसएमटी साप्ताहिक विशेष

सीएसएमटीवरून (फक्त गुरुवार) – 4 सेवा, डबे-24, मडगावसाठी 6 आणि 13 मार्च रोजी रात्री 12.20 वाजता सुटेल आणि मडगाववरून सीएसएमटीसाठी 6 आणि 13 मार्च रोजी दुपारी 2.15 वाजता सुटेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) मडगाव एलटीटी साप्ताहिक विशेष

(फक्त गुरुवार) – 4 फेऱ्या, डबे-14 , एलटीटीवरून मडगावसाठी 13 आणि 20 मार्च रोजी रात्री 9:15 वाजता सुटेल आणि मडगाववरून एलटीटीसाठी 14 आणि 21 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजता सुटेल.

एलटीटी हुजूर साहिब नांदेड-एलटीटी साप्ताहिक विशेष (Indian Railway)

(फक्त बुधवार) – 4 सेवा, डबे – 21, एलटीटीवरून नांदेडसाठी 12 आणि 19 मार्च रोजी मध्यरात्री 12.55 वाजता सुटेल आणि नांदेडवरून एलटीटीसाठी 12 आणि 19 रोजी रात्री 9.30 वाजता सुटेल.

पुणे -नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष (Indian Railway)

(मंगळवार आणि बुधवार) – 4 सेवा, डबे -20, पुण्यावरून नागपूरसाठी 11 आणि 18 मार्च रोजी दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि नागपूरवरून पुण्यासाठी 12 आणि 19 मार्च रोजी सकाळी 8 वाजता सुटेल.

पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष

(बुधवार आणि गुरुवार) 4 सेवा, डबे-17, पुण्यावरून नागपूरसाठी 12 आणि 19, मार्च रोजी दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि नागपूरवरून पुण्यासाठी 13 आणि 20 रोजी सकाळी 8 वाजता सुटेल.