Indian Railway : फुकट्यांची सुटका नाही ! रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून कडक वसुली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway : भारतामध्ये ट्रेन म्हणजे दळणवळणाच्या साधनांपैकी एक महत्वाचे साधन आहे. रेल्वे आपल्या प्रवाशांकरिता अनेक सुविधा आणत असते. भारतीय रेल्वे सुद्धा डिजिल भारत च्या मोहिमेमध्ये आपले योगदान देत आहे. लवकरच भारतीय रेल्वे कडून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी डिजिटल सुविधा आणली जाणार आहे. याच अनुषंगाने १ एप्रिलपासून रेल्वे जेवणापासून तिकीट, दंड आणि पार्किंगपर्यंत सर्वत्र ऑनलाइन (Indian Railway) पेमेंट करण्याची सुविधा सुरू करत आहे. विशेष म्हणजे आता रेल्वे क्यूआर कोड स्कॅन करून ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडूनही दंड वसूल करणार आहे.

मात्र, रेल्वेच्या या पाऊलामुळे प्रवाशांचीही सोय होणार आहे. प्रवासादरम्यान एखादा प्रवासी तिकीट नसताना पकडला गेला आणि त्याच्याकडे रोख रक्कम नसेल तर तो डिजिटल पेमेंट (Indian Railway) करून तुरुंगात जाणे टाळू शकेल. यासाठी रेल्वे चेकिंग कर्मचाऱ्यांना हँडहोल्ड टर्मिनल मशीन पुरवणार आहे.

दंडही ऑनलाईन वसूल होणार (Indian Railway)

देशातील अनेक स्थानकांवरील चेकिंग कर्मचाऱ्यांपर्यंत हँडहोल्ड टर्मिनल (Indian Railway) मशीन्सही पोहोचल्या आहेत. इतर ठिकाणीही ते लवकरच सुरू करण्याचे काम सुरू आहे. याद्वारे ट्रेनमध्ये धावणारे सर्व टीटीई कोणत्याही प्रवाशाकडून ऑनलाइन दंड वसूल करू शकतील. यासाठी प्रवाशाला त्याच्या मोबाईलने मशीनमध्ये बसवलेला QR कोड स्कॅन करावा लागेल.

कॅश बाळगण्याची गरज नाही (Indian Railway)

रेल्वेच्या या पाऊलामुळे पारदर्शकता येईल आणि तिकीट (Indian Railway) तपासणी कर्मचाऱ्यांवर होणारे आरोपही टळतील. रेल्वेच्या या पाऊलामुळे रोखीचे व्यवहार कमी होण्यास मदत होणार आहे. डिजिटल पेमेंटची सुविधा सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे आता तिकीट काउंटरवर क्यूआर कोड बसवले जाणार आहेत. याशिवाय पार्किंग आणि फूड काउंटरवर क्यूआर कोडची सुविधाही दिली जात आहे. तिकीट काउंटरवर QR सुविधेमुळे प्रवासी तिकिटांचे ऑनलाइन पैसे भरू शकतील. त्यामुळे रोकड घेऊन न जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.