IRFC IPO दुसर्‍या दिवशी 95% वेळा झाला सब्सक्राइब, रिटेल पोर्शन 1.8 पट भरले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय रेल्वे (Indian Railway) फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) चा आयपीओ, आज गुंतवणूकीच्या दुसर्‍या दिवशी 95 टक्क्यांनी सब्सक्राइब झाला आहे. रिटेल गुंतवणूकदारांचा त्यात मोठा वाटा आहे. कंपनीने 118.7 कोटी इक्विटी शेअर्स जारी केले आहेत तर 124.75 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लावण्यात आली आहे. बोलीच्या पहिल्याच दिवशी, 80 टक्के रिझर्व्ह सेक्शन रिटेल गुंतवणूकदारांसाठी सब्सक्राइब झाला होता. या शेअर्समध्ये अँकर बुकचा समावेश आहे. कंपनीच्या अँकर बुकला यापूर्वीच गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

रिटेल इनवेस्टर्सही या आयपीओमध्ये खूप रस घेत आहेत. IRFC ने रिटेल इनवेस्टर्ससाठी ठेवलेले भाग 1.8 वेळा सब्सक्राइब झाले आहेत. कर्मचार्‍यांसाठी ठेवलेला भाग 17.61 वेळा भरला आहे. गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा 14.7 टक्के असून संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा 0.02 टक्के भरलेला आहे.

प्राईस बँड 25-26 रुपये
कंपनीच्या इश्यूची प्राईस बँड प्रति शेअर 25-26 रुपये आहे. त्यातून 46,00 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची अपेक्षा आहे. या आयपीओनंतर कंपनीतील सरकारचा भागभांडवल 86.4 टक्क्यांवर जाईल. सध्या IRFC ने अँकर इन्व्हेस्टर्सकडून 1,390 कोटी रुपये जमा केले आहेत.

IRFC च्या आयपीओ अंतर्गत 178.20 कोटी शेअर्स जारी करण्यात आले आहेत. त्यापैकी 118.80 इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आहे, तर 59.40 कोटी इक्विटी शेअर्स प्रेसिडेंट ऑफ इंडिया कडून विकल्या जात आहेत. त्यापैकी 50 लाख रुपयांचे शेअर्स कर्मचार्‍यांसाठी रिझर्व्ह आहेत.

किती गुंतवणूक करावी लागेल ?
यासाठी कमीतकमी 575 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावण्याची आवश्यकता असेल. म्हणजेच 575 शेअर्सचा एक लॉट असेल. या आयपीओमध्ये जास्तीत जास्त 13 लॉटसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात. IRFC च्या आयपीओमध्ये, इश्यूचा 50 टक्के हिस्सा पात्र संस्थागत खरेदीदार (QIB) साठी आरक्षित आहे. तर संस्थागत खरेदीदारांसाठी 15 टक्के, तसेच किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के रिझर्व्ह आहेत.

अर्ज कसा करावा
इतर कोणत्याही आयपीओ प्रमाणे, कोणीही त्यांच्या बँकेत उपलब्ध असलेल्या ब्लॉक्ड रकमेद्वारे समर्थित अप्लिकेशनद्वारे अर्ज करू शकतो. याशिवाय आयपीओ फॉर्मद्वारेही अर्ज करता येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment