Indian Railway : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला असून, आता ट्रेनमध्ये पुरवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची मेन्यू कार्ड आणि दर सूची अनिवार्य करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली असून, आता प्रत्येक प्रवाशाला त्यांच्या मागणीवरून छापील मेन्यू कार्ड (Indian Railway) उपलब्ध करून दिले जाणार आहे.
रेल्वेतील खाद्यपदार्थांचे दर आता स्पष्ट दिसणार
रेल्वेतील पँट्री कार आणि अन्नसेवा व्यवस्थापनासाठी (IRCTC) मेन्यू आणि दर सूची जाहीर करण्यात (Indian Railway) आली आहे. तसेच, IRCTCच्या अधिकृत वेबसाइटवरही हे दर उपलब्ध आहेत जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त शुल्काचा सामना करावा लागणार नाही.
एसएमएस अलर्टसह नव्या सुविधा (Indian Railway)
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, आता प्रवाशांना एसएमएसद्वारे त्यांच्या तिकीट क्रमांकावर मेन्यू आणि दर यांची लिंक पाठवली जाणार आहे. यामुळे कोणताही प्रवासी गोंधळात पडणार नाही, तसेच अन्नसेवेतील पारदर्शकता वाढणार आहे.
स्वच्छता आणि दर्जा सुधारण्यासाठी महत्त्वाची पावले
रेल्वेमंत्र्यांनी पुढे सांगितले की, रेल्वेतील अन्नसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी खालील उपाययोजना करण्यात आल्या आहेत –
मॉडर्न बेस किचन – ठराविक स्थानांवर आधुनिक बेस किचन सुरू करण्यात येणार आहेत.
CCTV देखरेख – खाद्यपदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी बेस किचनमध्ये CCTV कॅमेरे बसवले जाणार आहेत.
गुणवत्तापूर्ण कच्चा माल – पिठ, तेल, डाळी, मसाले, दुग्धजन्य पदार्थ हे नामांकित ब्रँड्सचे वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
QR कोड प्रणाली – प्रत्येक अन्नपदार्थाच्या पॅकिंगवर QR कोड असणार आहे, ज्यामुळे त्याचा उत्पत्ती ठिकाण, पॅकिंग तारीख आणि स्वच्छतेची माहिती मिळू शकेल.
नियमित निरीक्षण आणि अन्ननमुना चाचणी – FSSAI प्रमाणित खाद्यसुरक्षा निरीक्षकांकडून नियमित चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
तृतीय पक्ष ऑडिट आणि ग्राहक समाधान सर्वेक्षण – अन्नाचा दर्जा आणि स्वच्छता तपासण्यासाठी तृतीय पक्ष (Indian Railway) ऑडिट तसेच ग्राहकांच्या प्रतिक्रियांवर आधारित सुधारणा करण्यात येणार आहेत.
प्रवाशांसाठी हा निर्णय का महत्त्वाचा? (Indian Railway)
भारतीय रेल्वेतील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अनेकदा प्रवाशांच्या तक्रारी असतात. मात्र, नव्या नियमांमुळे प्रवाशांना आता स्वच्छ, दर्जेदार आणि योग्य दरात खाद्यपदार्थ मिळतील. तसेच, एसएमएस अलर्ट आणि मेन्यू कार्डमुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा गैरवापर होणार नाही.