Indian Railway Recruitment 2024 | RPF मध्ये 4 हजारहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; येथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Indian Railway Recruitment 2024 असे अनेक विद्यार्थी असतात, ज्यांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची खूप इच्छा असते. रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी ते विविध परीक्षांची तयारी देखील करत असतात. आता याच विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली संधी आलेली आहे. ती म्हणजे आता रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे. ही सगळ्या उमेदवारांसाठी एक खूप मोठी संधी आहे. रेल्वे रिक्रुटमेंट (Indian Railway Recruitment 2024) बोर्डाने रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजे आरपीएफ आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स म्हणजे आरपीएस अंतर्गत एक मोठी भरती काढलेली आहे. ही भरती सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल या पदांसाठी केली जाणार आहे. यासाठी आणि आता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. 14 एप्रिल 2024 रोजी हे नोटिफिकेशन त्यांनी जाहीर केलेले आहे आणि 15 एप्रिलपासून ही अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटची लिंक देणार आहोत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

अर्ज शेवटची तारीख

आरआरबी आणि आरपीएफच्या रिक्त पदांसाठी 15 एप्रिलपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. ही अर्ज प्रक्रिया जवळपास एक महिना चालणार आहे.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 4660 रिक्त जागांची पदे भरली जाणार आहेत. यामध्ये 4208 ही कॉन्स्टेबलची पदे असणार आहे, तर उर्वरित 452 ही सब इन्स्पेक्टरची पदे असणार आहेत.

पात्रता | Indian Railway Recruitment 2024

सब इन्स्पेक्टर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थेतून पदवी पर्यंतचे शिक्षण झाले असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कॉन्स्टेबल पदासाठी दहावी किंवा समक्ष उमेदवार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

सब कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 20 वर्षाचे जास्तीत जास्त 28 वर्षे इतके असणे गरजेचे आहे. कॉन्स्टेबल या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 28 दरम्यान असणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया

यासाठी विद्यार्थ्यांसाठी निवड प्रक्रिया असणार आहे. विद्यार्थ्यांना निवडीच्या विविध टप्प्यावरील परीक्षा उत्तीर्ण करावे लागणार आहेत. यामध्ये ऑनलाईन कम्प्युटर बेस्ट सीबीटी, फिजिकल मेजरमेंट टेस्ट आणि डॉक्युमेंट वेरिफिकेशन या सगळ्याच्या आधारावर उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

अर्ज शुल्क

या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. एससी, एसटी, एक्स सर्विस मंथ महिला उमेदवार, ईबीसी कॅटेगरीतील उमेदवारांना 250 रुपये एवढे अर्ज शुल्क असणार आहे.

मासिक वेतन

सब इन्स्पेक्टर या पदावर निवड झालेल्या उमेदवाराला दर महिन्याला 35 हजार 400 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. तर कॉन्स्टेबल पदावर भरती झालेल्या उमेदवाराला दर महिन्याला 21 हजार 700 रुपये एवढा पगार दिला जाणार आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.