रेल्वे विभागात 1036 पदांची भरती; असा करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. RRB ने विविध मंत्रीस्तरीय आणि स्वतंत्र पदांसाठी तब्बल 1036 जागांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये भरतीमध्ये शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुवादक, कायदा तज्ञ यांसारख्या अनेक पदांचा समावेश असणार आहे. तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी त्याची पात्रता तपासून या पोस्टसाठी अर्ज करावा.

ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया –

अर्ज करण्याची प्रक्रिया 7 जानेवारी 2025 पासून सुरू होणार असून , ती 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरु राहणार आहे. तरीसुद्धा, अधिकृत सूचना अद्याप प्रकाशित झालेली नाही. अर्जदारांनी RRB वेबसाइटवर जाऊन वेळोवेळी अपडेट्स तपासणे गरजेचे आहे . यामध्ये नोकरीच्या अधिसूचनेत पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, निवड, रिक्त पदांचे विभाजन आणि इतर तपशीलांचा समावेश असेल. आरआरबी भरती महत्त्वपूर्ण आहे कारण ती भारतीय रेल्वेमधील विविध विभागांमधील पदांसाठी चांगल्या संधी प्रदान करते.

विविध विभागासाठी जागांची सूची –

जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये विविध विभागासाठी जागांची सूची देण्यात आली आहे. त्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक (PGT) साठी 187, ट्रेंड ग्रॅज्युएट शिक्षक (TGT) साठी 338 , सायंटिफिक सुपरवायझर (एर्गोनॉमिक्स आणि ट्रेनिंग) साठी 03, मुख्य कायदा सहाय्यक साठी 54, सार्वजनिक वकील साठी 20, फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (इंग्रजी माध्यम) साठी 18, सांस्कृतिक सहाय्यक / प्रशिक्षण साठी 02, ज्युनियर अनुवादक हिंदी साठी 130, सीनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर साठी 03, स्टाफ व वेल्फेअर इन्स्पेक्टर साठी 59, ग्रंथपाल साठी 10, संगीत शिक्षक (महिला) साठी 03 , प्राथमिक रेल्वे शिक्षक साठी 188, सहाय्यक शिक्षक (महिला प्राथमिक शाळा) साठी 02, प्रयोगशाळा सहाय्यक / शाळा साठी 07, आणि प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III (रसायनशास्त्र आणि धातूशास्त्र) साठी 12 पदे उपलब्ध आहेत. विविध शैक्षणिक आणि तांत्रिक क्षेत्रातील हि पदे इच्छुक उमेदवारांसाठी मोठ्या संधी प्रदान करणार आहे.

किती फी आकारली जाणार –

अर्ज करण्यासाठी सामान्य , OBC, आणि EWS प्रवर्ग यांच्याकडून 500 रुपये आकारले जातील. तसेच SC/ST च्या उमेदारांकडून 250 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. प्रत्येक पदानुसार पात्रतेचे निकष वेगवेगळे असणार आहेत . तरी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते तपासणे गरजेचे आहे. हे सर्व निकष पाहिल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. त्यामुळे तुमच्यासाठी रेल्वेने खूप चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. तरी या संधीचा सर्व पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा.