Indian Railway : ‘या’ विशेष ट्रेनला मिळाली मुदतवाढ ; पहा कोणत्या स्थानकांना होणार लाभ ?

Indian Railway e
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway : संपूर्ण देशभरात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. परवडणाऱ्या किंमतीत सुलभ प्रवास म्हणजे ट्रेनचा प्रवास. म्हणूनच लाखो प्रवासी ट्रेनने दररोज प्रवास करीत असतात. तुम्ही देखील राज्यातल्या कोकण रेल्वेने प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक (Indian Railway) महत्वाची बातमी आहे.

जबलपूर ते कोईमतुर दरम्यान सुरू झालेल्या विशेष ट्रेनला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेतला गेला आहे त्यामुळे. ही गाडी मार्च 2024 पर्यंत धावणार होती ती आता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालवण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून (Indian Railway) घेण्यात आलेला आहे.

रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सात जून 2024 पर्यंत जबलपूर जंक्शन ते कोईमतुर (Indian Railway) ही खास रेल्वे धावणार आहे. केवळ काही काळासाठी सुरू केलेल्या या रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे ही गाडी आणखी काही काळ चालवली जाणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

कोकणातील ‘या’ थांब्यांचा समावेश (Indian Railway)

ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावत असल्यामुळे कोकणातील रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर ही गाडी थांबा घेणार आहे.

दरम्यान ही गाडी कल्याण रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबवण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी (Indian Railway) होती मात्र अद्यापही रेल्वे प्रशासनानं तसा कोणताही निर्णय न घेतल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटतो आहे.