Indian Railway Ticket Hike : रेल्वेचं तिकीट महागणार; प्रवाशांना मोठा झटका

Indian Railway Ticket Hike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railway Ticket Hike । रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने आपल्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हि दरवाढ किरकोळ स्वरूपाची असली तरी आधीपेक्षा प्रवाशांचे जास्तीचे पैसे खर्च होणार आहेत. येत्या 20 जुलै 2025 पासून हे नवीन दर लागू होतील. भारतीय रेल्वे कोणत्या तिकिटांच्या किमतीत किती रुपयांची वाढ करणार आहे याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

किती रुपयांची वाढ – Indian Railway Ticket Hike

नवीन नियमांनुसार, १ जुलैपासून, सामान्य द्वितीय श्रेणीच्या ५०० किमी पर्यंतच्या प्रवासासाठी तिकिटाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही, परंतु ५०० किमीपेक्षा जास्त प्रवास केल्यास तिकिटाच्या किमतीत अर्धा पैसा प्रति किमी वाढ (Indian Railway Ticket Hike) करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, मेल एक्सप्रेस (नॉन-एसी) मध्ये प्रवास करणे देखील आता लोकांसाठी महाग होत आहे. आता प्रवाशांना या तिकिटावर प्रति किमी १ पैसे जास्तीचे द्यावे लागतील. यासोबतच, आता भारतीय रेल्वेने एसी क्लासचा प्रवास करणेही महाग होणार आहे. एसी क्लास तिकिटांची किंमत आता प्रति किमी २ पैसे वाढली आहे.

तस बघितलं तर कोरोना काळानंतर भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच आपल्या तिकिटांच्या किमती वाढवल्या (Indian Railway Ticket Hike) आहेत. परंतु हि दरवाढ अतिशय किरकोळ आहे. या नव्या तिकीट दरामुळे प्रवाशांना खूप मोठा आर्थिक फटका बसेल असं नाही. मात्र लांब पल्ल्याच्या प्रवासावर या भाडेवाढीचा परिणाम होणार आहे. जर एखादा प्रवासी मुंबई ते दिल्ली (1400 किमी) नॉन-एसी ट्रेनने प्रवास करत असेल तर त्याला 14 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. तर एसी क्लाससाठी 28 रुपयांनी त्याच तिकीट महागणार आहे.

दरम्यान, रेल्वेकडून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. 1 जुलै 2025 पासून तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधार ऑथेंटिकेशन गरजेचे असणार आहे. रेल्वे मंत्रालयाने 10 जून रोजी एका आदेशाद्वारे सर्व रेल्वे झोनना याबाबत माहिती दिली आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे आता दलाल किंवा अनधिकृत एजंटला फटका बसणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांना फायदा व्हावा यासाठी हे निर्णय घेतले असल्याचे रेल्वेने म्हंटल आहे.