Indian Railway : अरे देवा ! ट्रेन कॅन्सल झाली की काय ? कसे समजेल? जाणून घ्या रेल्वेच्या सुविधेबद्दल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway : भारतामध्ये ट्रेनचे सर्वात मोठे जाळे पसरले आहे. सार्वजनिक वाहतूक सुविधेमध्ये ट्रेन खूप महत्वाची भूमिका बजावते. शिवाय ट्रेनने केलेला प्रवास हा स्वस्त आणि आरामदायी असतो. म्हणूनच अनेक प्रवासी इतर सुविधांपेक्षा ट्रेनच्या प्रवासाला अधिक पसंती देतात. म्हणूनच दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात.

ट्रेनने प्रवास करण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात प्रत्येक वर्गाच्या लोकांसाठी सुविधा उपलब्ध आहेत. ज्यामध्ये जनरल, स्लीपर, एसी आणि लक्झरी या वर्गांचा समावेश आहे. पण ट्रेन रद्द झाल्यावर लोकांना सर्वात (Indian Railway) मोठा त्रास होतो.

मात्र आता काळजी करू नका तुम्ही रेल्वेने प्रवास करीत असाल तर रेल्वेची एक ऑनलाईन सुविधा त्यांच्या मोबाईलवरच तुम्हाला तुम्ही जाणार असलेल्या ट्रेनची माहिती देईल. तुमची ट्रेन रद्द झाल्याची माहिती सुद्धा तुम्हाला कळू शकेल. तुम्हाला (Indian Railway)यासाठी काय करावे लागेल ? तुम्ही तुमच्या ट्रेनचा स्टेट्स कसा जाणून घेऊ शकता ? चला जाणून घेऊया …

ट्रेन रद्द झाली की नाही हे कसे तपासाल ? (Indian Railway)

  • सर्वप्रथम तुम्हाला भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल, त्यानंतर ट्रेनची स्थिती जाणून घेण्यासाठी ‘ट्रेन स्टेटस’ किंवा ‘ट्रेन कॅन्सलेशन’ या पर्यायावर जावे लागेल.
  • येथे क्लिक करून तुम्हाला ट्रेनची सद्यस्थिती आणि रद्द केल्याची माहिती मिळेल. जर ट्रेन रद्द झाली असेल, तर तुम्हाला येथे Cancel लिहिलेले दिसेल.
  • प्रवासासाठी घर सोडण्यापूर्वी ट्रेनची स्थिती तपासा.
  • IRCTC च्या मोबाईल ॲपवर चेक करणे हा एक सोयीचा मार्ग आहे.
  • याशिवाय तुमच्या नंबरवर ट्रेन रद्द झाल्याचा मेसेजही येईल.
  • लक्षात ठेवा तुमच्या तिकीट बुकिंगवर टाकलेल्या मोबाईल नंबरवर ट्रेन रद्द झाल्याचा संदेश येतो.
  • भारतीय रेल्वे कधीकधी एसएमएस किंवा ईमेलद्वारे ट्रेनच्या स्थितीबद्दल (Indian Railway)माहिती पाठवते.

कसा मिळवाल रिफंड ? (Indian Railway)

आता प्रश्न पडतो की ट्रेन रद्द झाल्यानंतर तिकिटाचे पैसे परत कसे मिळतील ? तर त्याचीही सोय रेल्वेने करून दिली आहे. तुमची ट्रेन भारतीय रेल्वेने रद्द केली असेल, तर तुम्हाला अर्ज न करता तिकिटाचा परतावा मिळेल. परंतु परतावा न मिळाल्यास, तुम्ही रेल्वेशी संबंधित माहिती किंवा तक्रारीसाठी Rail Madad हेल्पलाइन नंबर- 139 डायल करू शकता. याशिवाय तुम्ही तुमची तक्रार IRCTC क्रमांक 011-23344787 वर नोंदवू शकता.