Indian Railway : देशभरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. सध्या भारतात चालवल्या जाणाऱ्या ट्रेन्स पैकी प्रत्येक ट्रेनची एक वेगळी खासियत आहे. आज आम्ही तुम्हाला ट्रेनच्या एका खासियत विषयी सांगणार आहोत. तुम्हाला रेल्वे प्रवास करताना असा कधी प्रश्न पडला आहे का ? की जनरल डब्याला 3 आणि एसी किंवा स्लीपर कोचला 2 गेट का असतात ? चला जाणून घेऊया या प्रश्नाचं उत्तर
रांची रेल्वे विभागाचे वरिष्ठ डीसीएम, निशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सामान्यत: सामान्य डब्यात तीन गेट ठेवले जातात. त्याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी एसी आणि स्लीपर कोचमध्ये दोन (Indian Railway) दरवाजे देण्यात आले आहेत. यामागे एक प्रमुख कारण आहे की, बहुतेक जनरल डब्यांमध्ये सीट क्षमतेपेक्षा जास्त लोक बसतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे जनरल डबे जॅम होतात. त्यात मोठी गर्दी असते. वर-खाली करताना लोकांना धक्काबुक्कीचा सामना करावा लागतो. कधी कधी काही गाडयांना ही गर्दी एवढी जास्त असते की लोक दरवाजात लोंबकाळत प्रवास करतात.
जर जनरल डब्ब्यांना दोनच गेट दिले तर चढताना आणि उतरताना (Indian Railway) गर्दी होत असल्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होतील. शिवाय जनरल डब्ब्यात चढणाऱ्या प्रवाशांची इतकी गर्दी असते की दोनच गेट असल्यानंतर चढणे सुद्धा मुश्किल होईल.
स्लीपर आणि एसी कोचबद्दल बोलायचे झाले तर, या दोन्ही डब्यांमध्ये (Indian Railway) फक्त आरक्षण असलेले प्रवासीच प्रवेश करू शकतात. यामध्ये एकही अनारक्षित प्रवासी शक्यतो नसतो. त्यामुळेच त्यात जास्त धक्के बसत नाहीत आणि जेवढ्या प्रवाशांची जागा आहे तेवढेच प्रवासी चढतात . म्हणूनच त्याला दोन दरवाजे असतात.
याशिवाय आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे एसी आणि स्लीपर कोचमध्ये (Indian Railway)दोन दरवाजे दिल्यास कोचमध्ये अधिक जागा उपलब्ध होते आणि सीटची संख्या वाढते. त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांना आरक्षण आसनाचा लाभ घेता येतो.