Indian Railway : डोकं खाजवा मंडळी ! ट्रेनला सुरवातीला आणि शेवटीच का असतात जनरल डब्बे ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway : भारतीय रेल्वेचे मोठे जाळे देशभर पसरले आहे. भारतीय रेल्वे दळणवळणाच्या सुविधांमध्ये प्रमुख भूमिका बजावते. म्हणूनच भारतीय रेल्वे नेटवर्क देशातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते तर जगभरात भारतीय रेल्वेचा क्रमांक चौथा लागतो. सर्वात सोयीस्कर आणि परवडणारा प्रवास म्हणून रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. शिवाय रेल्वेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला सुद्धा मोठा (Indian Railway) हातभार लागतो. तुम्ही ज्या रेल्वेमधून प्रवास करता त्याबद्दल काही रंजक गोष्टी आज आम्ही सांगणार आहोत.

तुम्ही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का ? रेल्वेला (Indian Railway) डबे जोडत असताना एका ठराविक क्रमानेच रेल्वेचे डब्बे का बरं जोडले जातात ? म्हणजेच इंजिन नंतर रेल्वेच्या पुढे आणि मागच्या बाजूलाच रेल्वेचे जनरल डब्बे जोडले जातात. लेडीज , AC डब्बे हे रेल्वेच्या मध्यभागी असतात. चला तर मग जाणून घेऊया काय आहे यामागचे नक्की कारण ?

सुरक्षा आणि सुविधा (Indian Railway)

रेल्वेत कोचचा क्रम हा सुविधा आणि सुरक्षा लक्षात घेऊन ठेवला जातो. त्यानुसारच रेल्वेगा़डीचं डिझाईन केलं जातं. अप्पर क्लास डबा, लेडिज डबा हे रेल्वेच्या मध्यभागी असतात; तर सर्वाधिक गर्दीचे जनरल डबे हे अग्रभागी (Indian Railway) आणि सर्वांत शेवटी असतात. ट्रेन थांबल्यानंतर AC कोचमधून सहज प्रवासी स्थानकात पोहचू शकतात.

गर्दीचे विभाजन (Indian Railway)

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रेल्वे थांबल्याबाहेर नंतर रेल्वेतले प्रवासी एकाचवेळी बाहेर पडतात. जनरल डब्ब्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. हे डब्बे सुरुवातीला आणि शेवटी असल्यामुळे या गर्दीचे विभाजन होते