हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने आज आपला जाहीरनामा जनतेसमोर सादर केला. ज्यात गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांवर विशेष लक्ष भाजपने केंद्रित केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मोठमोठी आश्वासने देशवासियांना दिली आहेत. आपल्या भाषणात मोदींनी भारतीयांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेबद्दल (Indian Railways) सुद्धा मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. आत्ता देशातील पश्चिम भागात म्हणजे मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरु आहे, परंतु येत्या काळात देशातील पूर्वेकडील भागात, उत्तरेकडे आणि दक्षिणेत सुद्धा अशाच प्रकारे बुलेट ट्रेन चालवण्यात येतील असं मोदींनी म्हंटल आहे.
रेल्वेबाबत मोदींनी कोणकोणती आश्वासने दिली? Indian Railways
नवीन ट्रॅक तयार करू :
येत्या काळात प्रवासी तसेच मालवाहू वाहतुकीची क्षमता वाढवण्यासाठी रेल्वे नेटवर्कचा (Indian Railways) विस्तार करेल असं आश्वासन भाजपने दिले आहे. मागील १० वर्षात आम्ही जवळपास 31,000 किमीचे रेल्वे ट्रॅक बांधले आहेत. आता यामध्ये दरवर्षी आणखी 5000+ किलोमीटर नवीन ट्रॅक जोडण्याचा संकल्प भाजपने मांडला आहे.
कवच ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीमचा विस्तार करणार :
रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कवच ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीमचा विस्तार करणार असे भाजपने म्हंटल आहे. आम्ही ज्याप्रमाणे रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण केले त्याचप्रमाणे कवच सिस्टीमचे उत्पादन, डिझाईन आणि स्थापना मिशन मोडमध्ये करण्याचे आश्वासन भाजपने दिले.
मेट्रो नेटवर्कचा विस्तार करू :
शेवटच्या माईल कनेक्टिव्हिटीची खात्री करून प्रमुख शहरी केंद्रांमध्ये मेट्रो नेटवर्कचा विस्तार करू असं भाजपने सांगितलं आहे.
वंदे भारत ट्रेनची संख्या वाढवणार –
मोदींनी आपल्या भाषणात म्हंटल कि, पुढील काही काळात वंदे भारत स्लीपर, वंदे भारत मेट्रो आणि वंदे भारत साधारण ट्रेनची संख्या वाढवणार
बुलेट ट्रेनचा विस्तार होणार –
देशाच्या चारही कोपऱ्यात प्रत्येकी एक बुलेट ट्रेन (Bullet Train) सुरु करणार. आत्ता देशाच्या पश्चिमेकडील भागात मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु आहे. लवकरच या रेल्वे ट्रॅकचे काम पूर्ण होईल. परंतु विकसित भारताच्या पार्श्वभूमीवर देशाच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिण भागात सुद्धा बुलेट ट्रेन सुरु करणार असं मोदींनी म्हंटल आहे.