Indian Railways : लाल, निळ्या, पिवळ्या आणि हिरव्या ट्रेनमध्ये काय फरक असतो? प्रवाशांनो, तुम्हाला हे माहिती हवंच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे (Indian Railways) हे प्रवासाचे उत्तम साधन आहे. लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त आणि महत्वाचे म्हणजे कमी खर्चात प्रवास असल्याने अनेकजण रेल्वेने प्रवास करण्याला आपलं प्राधान्य देत असतात. भारतात दररोज सुमारे 23 दशलक्ष लोक रेल्वेने प्रवास करतात. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरले असून कोणत्याही ठिकाणावरून कुठेही तुम्ही रेल्वेने आरामात जाऊ शकता. परंतु तुम्ही प्रवास करत असताना नेहमी निळया, लाल, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाची ट्रेन बघितली असेल. रेल्वेचा असा वेगवेगळा रंग असण्यामागे नेमकं काय कारण आहे? या सर्व ट्रेनमध्ये कोणता फरक आहे? हे तुम्हाला माहितेय का? नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत सगळं काही सविस्तर सांगतो.

लाल रंग-

भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) लाल रंगाच्या बोगींना लिंक हॉफमन बुश म्हणतात. भारतीय रेल्वेने 2000 साली अशा प्रकारचे कोच आयात केले होते. आता हे डबे पंजाबमधील कपूरथला येथे तयार करण्यात आले आहेत. खास करून लांबच्या पल्ल्याच्या प्रवासासाठी लाल रंगाच्या ट्रेनचा वापर करतात. भारतात राजधानी किंवा शताब्दी सारख्या गाड्यांमध्ये लाल डबे वापरले जातात. इतर डब्यांच्या तुलनेत हे डबे हलके असतात त्यामुळे या रेल्वेगाड्या जलद पद्धतींने म्हणजेच ताशी दोनशे किलोमीटर वेगाने धावू शकतात.

निळा रंग- Indian Railways

या रंगाच्या डब्याला इंटिग्रल कोच म्हणतात. इंटिग्रल कोच फॅक्टरीत हे तयार केले जातात. मेल एक्सप्रेस किंवा इंटरसिटीमध्ये साधारणपणे निळ्या रंगाचे डबे वापरले जातात. या रेल्वेगाड्यांचा वेग हा साधारणतः 70 ते 140 किमी प्रति तास असतो. एक्स्प्रेस किंवा सुपरफास्ट गाड्यांमध्ये निळ्या रंगांच्या रेल्वेचा समावेश असतो.

हिरवा रंग-

गरीब रथमध्ये हिरव्या रंगाचे डबे वापरले जातात. हिरव्या रंगाच्या डब्यांवर विविध प्रकारची पेंटिंग्ज केली जातात. कधी कधी हायस्पीड ट्रेनमध्येही हिरव्या रंगाचा कोच वापरला जातो.

पिवळा रंग –

भारतातील काही रेल्वेगाड्या या पिवळ्या रंगाच्या सुद्धा असतात. खास करून कमी अंतराच्या रेल्वेगाड्यांमध्ये पिवळ्या रंगाचे डबे वापरले जातात. या डब्यांच्या खिडक्या उघड्या असतात . अनेक वेळा शारीरिकदृष्ट्या अपंग प्रवाशांसाठीही पिवळ्या रंगाचे डबे वापरले जातात. कोरोना काळात तर असे कोच आयसोलेशन वॉर्ड म्हणून चालवले जात होते.