Indian Railways : रेल्वेत Free मध्ये मिळतात ‘या’ गोष्टी; तुम्हांला माहिती असायलाच हवं

Indian Railways free services
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात रेल्वेचं (Indian Railways) जाळं सर्वात मोठं आहे… देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आपण रेल्वेने जाऊ शकतो. इतर वाहनांपेक्षा कमी खर्चात प्रवास होत असल्याने अनेकजण रेल्वे प्रवाशाला प्राधान्य देतात. त्यातच रेल्वेचा प्रवास हा आरामदायी असल्याने अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध प्रवाशांपर्यंत सर्वच जण त्याचा आनंद घेत असतात.. तुम्ही सुद्धा आजपर्यंत अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल . परंतु तुम्हाला माहितेय का? भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा मोफत देत असते. म्हणजेच काय तर यासाठी प्रवाशांकडून कोणतेही पैसे घेतले जात नाहीत…. या सुविधा नेमक्या आहेत तरी कोणत्या ते आपण आज सविस्तर जाणून घेऊयात…..

१) Free Wifi – Indian Railways

भारतीय रेल्वे अनेक स्थानकांवर प्रवाशांना मोफत वाय-फाय सुविधा देते. जर तुम्ही स्टेशन वर लवकर पोचला असेल किंवा तुमची ट्रेन उशिरा येणार असेल तर तुम्ही वाय-फायचा वापर करत मनसोक्त आनंद घेऊ शकता. आजकाल मोबाईल मध्ये इंटरनेट असेल तर एखाद्या प्रवाशाचा वेळही लवकर जातो.

२) AC कोचमध्ये बेडशीट, ब्लँकेट आणि उशी-

जर तुम्ही AC , सेकंड AC आणि थर्ड AC मध्ये प्रवास करत असाल, तर तुम्हाला घरून बेडिंग आणावे लागणार नाही कारण तुम्हाला ट्रेनमध्ये स्वतःला झाकण्यासाठी ब्लँकेट आणि उशी मिळेल. तुम्हाला संपूर्ण बेडरोल (ट्रेनमध्ये बेडरोल) दिला जाईल.. तुमचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर हा बेडरोल तुम्हाला परत करावा लागेल. रेल्वेमध्ये या सुविधा फ्री असतात, परंतु गरीब रथ एक्सप्रेस ट्रेनमध्ये, यासाठी तुम्हाला २५ रुपये मोजावे लागतील.

३) वैद्यकीय सेवा –

भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) प्रवासादरम्यान प्रवाशांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. ट्रेनमध्ये अचानक कोणता प्रवासी आजारी पडला तर त्याला वैद्यकीय सेवा मिळू शकते. यासाठी रेल्वे अधीक्षक, तिकीट कलेक्टर किंवा इतर कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्याशी तुम्ही प्रवास करताना संपर्क साधू शकता.

४) मोफत विमा-

भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना कमी किमतीत विमा सुविधा सुद्धा प्रदान करते. रेल्वे कडून प्रवाशांना 10 लाख रुपयांचा विमा मिळतो. या विम्यासाठी, प्रवाशाला तिकीट खरेदी करताना फक्त ४९ पैसे द्यावे लागतात. म्हणजेच तुम्ही अवघ्या ४९ पैशात 10 लाख रुपयांचा विमा काढू शकता.

५) वेटिंग रूममध्ये आराम –

जर तुमची ट्रेन कोणत्याही कारणास्तव उशिरा आली तर तुम्ही तुमचे तिकीट रेल्वे स्टेशन अधिकाऱ्यांना दाखवू शकता आणि स्टेशनवरील एसी आणि नॉन-एसी वेटिंग हॉलमध्ये आरामात वाट पाहू शकता. ही सुविधा प्रवाशांना अगदी मोफत मिळेल.