हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे भारतभर पसरलेले आहे. जगातील चौथे मोठे रेल्वेचे जाळे असलेला आपला हा भारत देश आहे. 65000 km पेक्षा अधिक मोठे रेल्वेचे जाळे आहे. भारतीय रेल्वेद्वारे प्रवासी वाहतुकीसोबतच मोठ्या प्रमाणात मालवाहतूक देखील केली जाते. रेल्वेच्या कमाईचा मोठा भाग प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीतून अधिक येतो. त्यामुळेच रेल्वेचा जास्त भर मालवाहतूक वाढवण्यात अधिक असतो . यातूनच भारतीय रेल्वेने चालू आर्थिक वर्षातील एप्रिल – ऑक्टोबर तिमाहीत तब्बल 96000 करोड रुपयांची कमाई मालवाहतुकीतून केली आहे.
31.61 मेट्रिक टन इतकी अधिक वाढ -Indian Railways
चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर या तिमाहीत एकूण 887.25 मेट्रिक टन इतक्या मालाची वाहतूक करण्यात आली आहे. ही मालवाहतूक मागील आर्थिक वर्ष्याच्या तुलनेमध्ये 31.61 मेट्रिक टन इतकी अधिक आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने मालवाहतुकीत वाढ नोंदवली आहे. ही वाढ 3.56% इतकी अधिक आहे. भारतीय रेल्वेने जारी केलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यापर्यंत भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून आजपर्यंत 95,929.30 करोड रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई मागील वर्षाच्या तुलनेत 3584.03 करोड इतकी जास्त आहे. म्हणजेच पैशाच्या स्वरूपात 3.73 % इतकी नोंदवण्यात आली आहे.
ऑक्टोबर महिन्यात देखील अश्याच स्वरूपात वाढ नोंदवण्यात आली आहे. संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये भारतीय रेल्वेने 129.03 मेट्रिक टन इतका मालाची वाहतूक केली असून जी की मागील वर्षी 118.95 मेट्रिक टन इतकी होती. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात 8.47% इतक्या प्रमाणात मालवाहतुकीमध्ये वृद्धी नोंदवण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात भारतीय रेल्वेच्या कमाईचा विचार केला तर 14232.05 करोड इतकी कमाई करण्यात आली आहे. मागील वर्षी हाच रिव्हेनु 13,353.81 करोड इतका होता. ज्यामध्ये 6.57 % इतकी वृद्धी दर्शवते.
भारतीय रेल्वेचा EDFC ( Eastern dedicated freight corrider ) देखील पुर्ण स्वरूपात मालवाहतुकीसाठी सुरु करण्यात आला आहे. त्याचबरोबर WDFC ( Western dedicated freight corridor ) चा मोठा हिस्सा मालवाहतूकसाठी खुला करण्यात आलेला आहे. काही दिवसात WDFC चा पुर्ण हिस्सा खुला करण्यात येईल. यामुळे भविष्यात भारतीय रेल्वेची (Indian Railways) मालवाहतुकीची क्षमता अधिक स्वरूपात वाढणार आहे. त्यामुळे त्याच स्वरूपात रिव्हनु देखील वाढेल.