वर्षभरात रेल्वेने दिल्या 1.50 लाख नोकऱ्या; कोणत्या विभागात किती पदे भरली?

Indian Railways Jobs
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात सरकारी नोकरी (Government Jobs) ही अतिशय महत्वाची मानली जाते. त्यासाठी विविध परीक्षा घेतल्या जातात. आणि त्याद्वारे नोकऱ्याही मिळतात. त्यातीलच महत्वाची मानली जाणारी नोकरी म्हणजे रेल्वे विभाग (Indian Railways) . गेल्या वर्षभरात रेल्वेने तब्बल दीड लाख तरुणांना नोकऱ्या दिल्याची आकडेवारी समोर आली आहे. ईशान्येकडील फ्रंटीयार या प्रसिद्धीपत्रकातुन ही आकडेवारी समोर आली आहे. या जागा रेल्वेत असलेल्या विविध विभागातील होत्या. प्रधानमंत्री मोदी यांनी याबाबत घोषणा केल्यानंतर ही भरती करण्यात आली होती. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे 2014 पासून आतापर्यंत तब्बल 5 लाख जणांना नोकरी (Jobs In Indian Railways) मिळाली आहे.

कोण कोणती होती पदे?

रेल्वेसाठी करण्यात आलेल्या भरतीत स्टेशन मास्टर्स, ट्रेन मॅनेजर, ट्रॅक मेंटेनर, सहाय्यक लोको पायलट, कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ, व्यावसायिक लिपिक, पॉइंट्समन आणि यांत्रिक, इलेक्ट्रिकल, नागरी, सिग्नल आणि दूरसंचार इत्यादी विभागातील सहाय्यक अशा विविध श्रेणींमध्ये ही भरती करण्यात आली होती. असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कशी घेण्यात आली परीक्षा?

रेल्वे असो किंवा इतर विभागाच्या परीक्षा असो या प्रत्येकाची परीक्षा ही वेगळ्या पद्धतीने घेतली जाते. अगदी तसेच रेल्वेच्या या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. डिसेंबर 2020 ते जुलै दरम्यान झालेल्या सर्व रेल्वे परीक्षांमध्ये तब्बल 2.37 कोटी उमेदवारांनी आपली हजेरी लावली होती. त्यानंतर ही संख्या 2021 मध्ये दुपटीने वाढली.

रोजगार निर्मितीसाठी रेल्वे करते प्रयत्न

भारतीय रेल्वे ही अनेक तरुनांना रोजगार देण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेते आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती करते. जसे की OHE , सिग्नलिंग, PUs आणि PSUs, स्टेशन पुनर्विकास कामे इत्यादी कामे सुरु केली जातात आणि त्यानुसार पद भरती केली जाते. या प्रकल्पामुळे तब्बल 35 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या.

2023 या वर्षात तब्बल 2.6 लाख भांडवल देण्यात आले

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे 2023-24 या चालू आर्थिक वर्षात तब्ब्ल 2.6 लाख कोटी रुपयाचे भांडवल वाटप करण्यात आले. त्यामध्ये सप्टेंबर 2023 पर्यंतचा खर्च 1,50,444 कोटी एवढा आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 46 टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे भारतीय रेल्वेवर रोजगार निर्माण होण्यास मदत झाली.