Indian Railways | भारतामध्ये रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. अनेक प्रवासी आजकाल प्रवास करण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. अशातच रेल्वे अनेकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. इंडिया रेल्वे टुरिझम कॉर्पोरेशन रेल्वे टिकीट बुकिंगपासून अनेक सुविधा पुरवते. एवढेच नाही तर तुम्ही आयआरसीटीसी यांच्या मदतीने देखील दर महिन्याला चांगले पैसे कमावू शकता.यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला तिकीट एजंट म्हणून काम करावे लागेल. ज्याप्रमाणे रेल्वे काउंटरवर तिकीट ( Indian Railways) देण्याचे काम करतो. त्याप्रमाणे तुम्हाला देखील प्रवाशांना तिकीट काढून द्यावे लागेल.
अर्ज कसा करायचा? | Indian Railways
तिकीट एजंट बनण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाइन टिकिट बुक करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी आयआरसीटीसी या वेबसाईटवर जावे लागेल आणि एजंट म्हणून अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्ही अधिकृत तिकीट बुकिंग यानंतर तुम्ही तिकीट बुक करू शकता. तिकीट एजंटला देखील चांगले कमिशन मिळते.
तुम्हाला किती कमिशन मिळते?
कोणत्याही प्रवासाला नॉन एसी तिकीट बुक केल्यावर प्रत्येक तिकिटामध्ये 20 रुपयांनी एसी वर्गाचे तिकीट बुक केल्यावर प्रत्येक तिकिटामध्ये 40 रुपये कमिशन दिले जाते. तसेच तिकिटाच्या किमतीची काही टक्के रक्कम ही एजंटला दिली जाते. त्यामुळे तुम्ही जर एजंट बनला तर तुम्हाला मोठा फायदा होतो. तुम्ही एक महिन्यात तुम्हाला पाहिजे तेवढे तिकीट बुक करू शकता. त्याचप्रमाणे पंधरा मिनिटात तत्काळ तिकीट बुक करण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहे.
कमाई किती होईल? | Indian Railways
एका महिन्यात तुम्ही कितीही तिकिटे बुक करू शकता. म्हणजेच एक व्यक्ती एका महिन्यात अमर्याद तिकिटे बुक करू शकतो. यावेळी बुकिंग दरम्यान एजंटला कमिशन मिळते. या एजंटला दर महिन्याला 80 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. काम जरी कमी असले तरी 40 ते 50 हजार रुपये तुम्ही महिन्याला सहज कमवू शकता.
किती फी भरावी लागेल?
तुम्हाला जर एका वर्षासाठी तिकीट एजंट व्हायचे असेल. तर तुम्हाला आयआरसीटीसीला 3,999 रुपये भरावे लागेल दोन वर्षासाठी ही 6,999 रुपये एवढी आहे.