हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways । महाराष्ट्रातून तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणारे अनेक भाविक आहेत. तिरुपतीला जाण्यासाठी राज्यातून एसटी बस, रेल्वे आणि विमानाची सुविधा आहे. आता तिरुपतीला जाणाऱ्या भक्तांसाठी आणखी एक ट्रेन उपलब्ध करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून हिसार ते तिरुपती (Hisar to Tirupati Train) दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालवली जाणार आहे. हि रेल्वे आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमधून हि ट्रेन धावताना दिसेल. त्यामुळे या भागातील प्रवाशांनाही तिरुपतीला जाणे सोप्प होणार आहे.
कसं असेल वेळापत्रक? Indian Railways
खरं तर प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे विभागाने (Indian Railways) तिरुपती ते हिसार अशी आठवड्यातून एक वातानुकूलित विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या साप्ताहिक विशेष ट्रेनमध्ये एकूण २२ कोच असतील, यामध्ये २० थर्ड एसी कोच आणि २ पॉवर कार कोचचा समावेश आहे. तिरुपती-हिसार विशेष ट्रेनचा ट्रेन क्रमांक ०७७१७ असून ती आजपासून म्हणजेच ९ जुलैपासून २४ सप्टेंबर पर्यंत चालवली जाईल. ही ट्रेन दर मंगळवारी रात्री ११:४५ वाजता तिरुपतीहून निघेल आणि शनिवारी दुपारी २:०५ वाजता हिसारला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, ट्रेन क्रमांक ०७७१८ हि १३ जुलै ते २८ सप्टेंबर दरम्यान चालवली जाईल. ही ट्रेन दर रविवारी रात्री ११:१५ वाजता हिसारहून निघेल आणि बुधवारी सकाळी ११:३० वाजता तिरुपतीला पोहोचेल. या नव्या एक्सप्रेस ट्रेन मुळे तिरुपती बालाजीच्या भक्तांना मोठा फायदा होणार आहे.
कोणकोणत्या स्थानकांवर ट्रेन थांबणार?
हिसार ते तिरुपती दरम्यान चालवण्यात येणारी हि विशेष ट्रेन चिदावा, झुंझुनू, नवलगढ, सीकर, रिंगास, फुलेरा, किशनगड, अजमेर, नशिराबाद, बिजयनगर, भिलवाडा, चित्तौडगड, नीमच, मंदसौर, रतलाम, वडोदरा, उधना, नंदुरबार, भुसालगाव, भुसालगाव, भुसालगाव, अकरोळगाव, शेवाळगाव, मंदसौर येथे थांबेल. प्रवासादरम्यान हिंगोली, बसमत, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बसर, निजामाबाद, कामरेड्डी, मडचेल, मलकाजगिरी, काचेगुडा, जडचेर्ला, महबूबनगर, गडवाल, कुरनूल सिटी, ढोणे, गुंटकल, तडीपात्री, येरागुंटला, कडप्पा, राजमपेटा आणि रेगुंटा स्टेशन या रेल्वे स्थानकांवर थांबेल.




