भारतीय रेल्वे खास शैलीत अर्पण करीत आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली, आता ‘या’ ऐतिहासिक गाडीचे नाव आहे ‘नेताजी एक्स्प्रेस’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त भारतीय रेल्वे (Indian Railways) त्यांच्या स्वत: च्या शैलीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहे. रेल्वेने घोषित केले की, ऐतिहासिक हावडा-कालका मेलचे नाव ‘नेताजी एक्सप्रेस’ (Netaji Express) असे ठेवले जात आहे. हावडा-कालका मेल ही भारतीय रेल्वे नेटवर्कमधील सर्वात जुन्या गाड्यांपैकी एक आहे, जी अद्यापही रुळावर चालू आहे. ही ट्रेन सर्वप्रथम 1866 मध्ये चालविली गेली होती. म्हणजे ही ट्रेन 150 वर्षांपासून देशाची सेवा करत आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी ट्विट केले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य आणि विकासाच्या एक्सप्रेसवेवर भारताला पुढे नेले होते. त्यांच्या जयंतीनिमित्त ‘नेताजी एक्स्प्रेस’ लाँच केल्याने मला आनंद झाला आहे. भारतीय रेल्वेने ट्विट केले की, भारतीय रेल्वे 12311/12312 हावडा-कालका एक्सप्रेसचे नाव नेजाती एक्सप्रेसमध्ये बदलण्यात आम्हांला आनंद होत आहे. नेताजींनी आपल्या सामर्थ्याने देशाला स्वातंत्र्य व विकासाच्या मार्गावर नेले. कालका मेलचे सुरुवातीचे नाव 63 अप हावडा पेशावर एक्सप्रेस होते.

या ट्रेनमधूनच प्रवास करून गायब झाले होते नेताजी
18 जानेवारी 1941 रोजी 80 वर्षांपूर्वी नेताजींनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना चकवून धनबाद जिल्ह्यातील गोमो जंक्शन येथून याच ट्रेनमधूनच प्रवास केला होता. यानंतरच ते गायब झाले आणि कुणालाही सापडले नाहीत. नेताजींच्या आठवणींशी जोडल्या गेल्याने रेल्वेने कालका मेलला नेताजी एक्सप्रेस असे नाव दिले आहे. यापूर्वी 23 जानेवारी 2009 रोजी लालू प्रसाद यादव, माजी रेल्वेमंत्री, धनबाद जिल्ह्यातील गोमो जंक्शनला नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन गोमो असे नाव दिले. ही ट्रेन सध्या 02311 आणि 02312 स्पेशल ट्रेन म्हणून चालवित आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या ट्रेनचा वापर शिमला येथे जाण्यासाठी केला. तेव्हा उन्हाळ्यात शिमला ही देशाची राजधानी होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment