Indian Railways : गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेचा मास्टर प्लॅन; खुद्द रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railways : आपल्याला माहितीच आहे की रेल्वेने प्रवास करणारा एक मोठा वर्ग भारतात आहे. त्यातही लोकल जनरल डब्ब्यात प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या भारतीय रेल्वेवर गाड्यांमध्ये एसी कोचच जास्त असल्याचा आरोप होत आहे. या आरोपावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी भारतीय रेल्वे यावर्षी १० हजार नॉन-एसी डबे तयार करत असल्याचे म्हंटले (Indian Railways) आहे. त्यामुळे नॉन एसी डब्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत खासदार हरिस बिरन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, भारतीय रेल्वे जास्तीत जास्त नॉन-एसी कोच वापरत आहे. हरीस बिरन यांनी गाड्यांमध्ये गर्दी होत आहे का असा सवाल केला (Indian Railways) होता. या आव्हानाचा सामना करण्यासाठी सरकार काय पावले उचलत आहे? तसेच नॉन एसी गाड्यांची संख्या कमी केली जात आहे का? असा सवाल त्यांनी केला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री वैष्णव यांनी सांगितले की, कोविड 19 मुळे 2019 ते 2024 दरम्यान प्रवासी वाहतुकीत मोठा बदल झाला आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या चालवत आहे. वंदे भारत एक्सप्रेससोबत आम्ही अमृत भारत एक्सप्रेस देखील चालवली आहे. अमृत ​​भारत ही नॉन एसी ट्रेन आहे. याद्वारे रेल्वेने प्रवाशांना उच्च दर्जाची सेवा (Indian Railways) दिली आहे.

रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, गर्दीवर नियंत्रण (Indian Railways) ठेवण्यासाठी, सण, सुट्टी आणि पीक सीझनमध्ये मागणी वाढते तेव्हा रेल्वे विशेष गाड्या चालवते.याशिवाय गाड्यांची क्षमताही वाढवली जात आहे. भारतीय रेल्वे सध्या सुमारे 10 हजार नॉन-एसी जनरल क्लास आणि स्लीपर क्लास डबे तयार करत आहे.असे त्यांनी सांगितले.