हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways New Rules । भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण देशभरात पसरलं आहे. आरामदायी प्रवास आणि ते सुद्धा कमी खर्चात उपलब्ध असल्याने अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. खास करून लांबच्या पल्ल्यासाठी रेल्वेचं बेस्ट पर्याय ठरते. भारतात दररोज करोडो प्रवासी रेल्वेने ये जा करतात. तुम्हीही रेल्वे प्रवासी असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण आज म्हणजेच १ जुलैपासून भारतीय रेल्वेने काही नवीन नियम लागू केले आहेत. हे नियम रेल्वे भाडे, बुकिंग प्रक्रिया, चार्टमेकिंग आणि आरक्षण प्रोटोकॉलच्या बाबतीत करण्यात आले आहेत. आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
१) प्रवासाचे तिकीट महागले –
आजपासून रेल्वे प्रवास महागला आहे. सामान्य नॉन-एसी वर्गांसाठी, द्वितीय श्रेणीच्या रेल्वे भाड्यात दरवाढ करण्यात आली आहे. ५०० किमीपेक्षा जास्त प्रवास केल्यास तिकिटाच्या किमतीत अर्धा पैसा प्रति किमी वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, मेल एक्सप्रेस (नॉन-एसी) मध्ये प्रवास करणे देखील आता लोकांसाठी महाग होत आहे. आता प्रवाशांना या तिकिटावर प्रति किमी १ पैसे जास्तीचे द्यावे लागतील. यासोबतच, आता भारतीय रेल्वेने (Indian Railways New Rules) एसी क्लासचा प्रवास करणेही महाग होणार आहे. एसी क्लास तिकिटांची किंमत आता प्रति किमी २ पैसे वाढली आहे.
२) आरक्षण चार्ट 8 तास आधी लागणार – Indian Railways New Rules
१ जुलैपासून भारतीय रेल्वेच्या नियमात (Indian Railways New Rules) आणखी एक बदल म्हणजे अधिकाऱ्यांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी आरक्षण चार्ट आठ तास आधी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आरक्षण चार्ट ४ तासांपूर्वी लागायचा. त्यामुळे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही हे शेवटच्या क्षणी कळत होते. परंतु आता वेटिंग तिकिटे असलेल्यांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही हे ८ तास आधी कळणार आहे. आता दुपारी २ वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्यांसाठी चार्ट आदल्या दिवशी रात्री ९ वाजताच तयार केला जाईल.
३) प्रतीक्षा यादीची मर्यादा वाढवली-
आत्तापर्यंत वेटिंग लिस्ट मधील (Railway Waiting Ticket Rules) तिकिटांच्या मर्यादा जानेवारी २०१३ च्या परिपत्रकाद्वारे नियंत्रित केल्या जात होत्या. त्यात एसी फर्स्ट क्लासमध्ये ३०, एसी सेकंड क्लासमध्ये १००, एसी थर्ड क्लासमध्ये ३०० आणि स्लीपर क्लासमध्ये ४०० पर्यंत वेटिंग तिकिटे मिळू शकत होती. यामुळे अनेकदा प्रवाशांना अनिश्चित तिकिटांसह आरक्षित डब्यात चढावे लागत होते,, परिणांनी रेल्वेला मोठ्या गर्दीचा सामना करावा लागत होता. आता मात्र भारतीय रेल्वे लवकरच २०१३ ची वेटिंग लिस्ट तिकिट मर्यादा रद्द करणार आहे आणि प्रत्येक कोचमधील एकूण बर्थ क्षमतेच्या २५% पर्यंत वेटिंग लिस्ट तिकिटांची मर्यादा ठेवणारा एकसमान नियम लागू करणार आहे. उदाहरणार्थ, जर स्लीपर कोचमध्ये बुकिंगसाठी ४०० बर्थ उपलब्ध असतील, तर जास्तीत जास्त फक्त १०० तिकिटे वेटिंग यादीत दिली जातील.हा नियम स्लीपर, एसी ३-टियर, एसी २-टियर, एसी फर्स्ट क्लास आणि चेअर कार अशा सर्व वर्गांना लागू होतो
४) तत्काळ बुकिंगमध्ये एजंट्ससाठी निर्बंध-
भारतीय रेल्वेनं अधिकृत तिकीट बुकिंग करणाऱ्या एजंटांवर देखील काही निर्बंध घातले आहेत. नवीन रेल्वे नियमांनुसार, भारतीय रेल्वेच्या अधिकृत तिकीट एजंटना खिडकी उघडल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांसाठी सुरुवातीच्या दिवसाचे तत्काळ तिकिटे बुक करण्याची परवानगी राहणार नाही. याचा अर्थ त्यांना सकाळी १०.०० ते १०.३० वाजेपर्यंत AC वर्गांसाठी आणि सकाळी ११.०० ते ११.३० वाजेपर्यंत नॉन AC वर्गांसाठी तत्काळ तिकिटे बुक करण्यास मनाई असेल.
५) आधार- व्हेरिफिकेशन –
१ जुलैपासून, फक्त आधार कार्ड असलेल्या प्रवाशांनाच तत्काळ तिकीट बुकिंग करता येणार आहे. तत्काळ योजनेअंतर्गत तिकिटे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या वेबसाइट/त्याच्या अॅपद्वारे केवळ आधार प्रमाणित वापरकर्त्यांद्वारेच बुक करता येतील,” असे मंत्रालयाने म्हटले आहे. तात्काळ तिकिटं सर्वसामान्य आणि गरजू प्रवाशांना मिळावं यासाठी रेल्वे मंत्रालयानं हे बदल केले आहेत.