Indian Railways : ट्रेनच्या जनरल डब्ब्यात फक्त 150 प्रवाशांनाच तिकीट मिळणार?? रेल्वे घेणार मोठा निर्णय

Indian Railways
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways । आपल्या देशात रेल्वेचे जाळे मोठे आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे धावते. रेल्वेमुळे प्रवाशांना लांबच्या ठिकाणी अगदी आरामशीर प्रवास करता येतो. आपल्या प्रवाशांचा प्रवास सुखरूप आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे विभाग सुद्धा सातत्याने प्रयत्नशील असतो. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, रेल्वेने नुकतंच सर्व कोच आणि रेल्वे इंजिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वे विभाग याच्या पुढचं पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे.ट्रेनच्या जनरल डब्ब्यात फक्त १५० प्रवाशांनाच तिकीट देण्याचा रेल्वेचा विचार आहे . यामुळे ट्रेनमधील वाढती गर्दी आटोक्यात येईल.

खरं तर ट्रेनच्या एका डब्ब्यात १५० प्रवाशांच्या बसण्याची (Indian Railways) व्यवस्था असते, परंतु याठिकाणी ३००- ४०० प्रवासी गर्दी करतात. यावर उपाय करण्यासाठी आणि हि वाढती गर्दी नियंत्रीत ठेवण्यासाठी, आता अनारक्षित कोचमध्ये तिकिटे देण्याची मर्यादा देखील निश्चित केली जात आहे. या अंतर्गत, ज्या स्टेशनवरून गाड्या सुरू होतात त्या स्टेशनवरून फक्त १५० तिकिटे दिली जातील. त्याच वेळी, रूट दरम्यान येणाऱ्या स्थानकांवर एकूण क्षमतेच्या फक्त २० टक्के तिकिटे दिली जातील. . या चाचणीसाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर पुढील ३ तासांत धावणाऱ्या गाड्यांच्या तिकिटांचीच गणना करते. जर चाचणी यशस्वी झाली तर ती देशभरात लागू केली जाईल. प्रत्यक्षात, फेब्रुवारीमध्ये महाकुंभमेळ्यादरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एक अपघात झाला होता. तेव्हापासून, स्टेशनवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.

SL आणि AC कोचमध्ये वेटिंग तिकिटांची मर्यादा देखील निश्चित – Indian Railways

दरम्यान, केवळ सामान्य कोचच नाही, तर रेल्वेने स्लीपर आणि एसी कोचमध्ये वेटिंग तिकिटांची मर्यादा देखील निश्चित केली आहे. नवीन नियमानुसार, एसी कोचमध्ये उपलब्ध जागांच्या ६० टक्के आणि स्लीपर कोचमध्ये सीट क्षमतेच्या ३० टक्के पर्यंत वेटिंग तिकिटे दिली जातील. रेल्वेच्या या प्रयत्नांमुळे गाड्या आणि प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होईल. सध्या, अनारक्षित तिकिटांच्या विक्रीवर मर्यादा घालण्याचा कोणताही नियम नाही. त्यांची विक्री सतत सुरू राहते. अनेक वेळा ३५० पेक्षा जास्त प्रवासी अनारक्षित कोचमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे रेल्वे विभागाने जर जनरल डब्ब्यात फक्त १५० प्रवाशांनाच तिकीट देण्याचा निर्णय घेतला तर देशभरातील रेल्वे प्रवाशांना (Indian Railways) मोठा फायदा होईल हे मात्र नक्की….