हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways Rules । भारतात रेल्वेचे जाळे हे सर्वात मोठं आहे. रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आ[न सहज जाऊ शकतो. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. लांबच्या पल्ल्यासाठी उपयुक्त आणि कमी खर्च लागत असल्याने रेल्वेला प्रवाशांचा मोठा पाठिंबा बघायला मिळतो. त्यातच भारतात राजधानी एक्सप्रेस, वंदे भारत ट्रेन, वंदे भारत साधारण ट्रेन अशा नवनवीन रेल्वेगाड्या असल्याने प्रवाशांचा प्रवास सोप्पा होतो. परंतु रेल्वे प्रवास करत असताना रेल्वेच्या काही नियमांचे पालन करणेही गरजेचं आहे. मात्र अनेकदा प्रवाशाना रेल्वेचे हे नियम माहीतच नसतात. खास करून जेव्हा तुम्ही रात्रीचा प्रवास करता तेव्हा तुम्हाला अधिक सावधगिरीने राहावं लागत, अन्यथा तुमच्यावर कठोर कारवाईची शक्यता असते.
काय आहेत रेल्वेचे नियम – Indian Railways Rules
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी ट्रेनमध्ये मोठ्याने बोलता येत नाही. याशिवाय रात्रीच्या वेळी ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यासही मनाई आहे. असे केल्याने सहप्रवाशांची झोप खराब होऊ शकते. याबाबत तक्रार केल्यास कारवाई केली जाऊ शकते.
तुम्ही एखाद्या व्यक्तीशी फोन वरूनही मोठ्या आवाजात बोलू शकत नाही.. याचेही कारण हेच आहे कि तुमच्यामुळे इतर प्रवाशाना नाहक त्रास होऊ शकतो किंवा त्यांची झोपमोड होऊ शकते. (Indian Railways Rules)
टीटीई रात्री १० नंतर आणि सकाळी ६ वाजण्यापूर्वी तुमचे तिकीट तपासू शकत नाही. परंतु , जर तुम्ही रात्री १० नंतर ट्रेनमध्ये चढला असाल तर मात्र टीटीईला तुमचे तिकीट तपासण्याचा अधिकार आहे.
खालच्या बर्थवर बसलेला प्रवासी रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत मधला बर्थ उघडण्यास आक्षेप घेऊ शकत नाही. जर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला या नियमांची माहिती असणे महत्त्वाचे आहे.
ट्रेनची सुरक्षितता लक्षात घेऊन रेल्वेने ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्थानकांवर धूम्रपान किंवा मद्यपान करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. जर टीटीईने तुम्हाला रेल्वेमध्ये धूम्रपान किंवा मद्यपान करताना पकडले तर तुम्हाला दंड आकारला जातो किंवा ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास देखील होऊ शकतो. Indian Railways Rules
रेल्वेच्या नियमांनुसार ट्रेनमध्ये स्फोटके किंवा ज्वलनशील वस्तू घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. तुम्ही ट्रेन मधून फटाके, रॉकेल तेल, पेट्रोल, गॅस सिलिंडर यासारख्या वस्तू घेऊन जाऊ शकत नाही. असं काही करताना तुम्ही आढळला तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते.