हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात रेल्वे प्रवासाला अनेकजण प्राधान्य देत असतात. लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त आणि महत्वाचे म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात रेल्वे प्रवास शक्य असल्याने अनेकजण रेल्वेने प्रवास करतात. भारतात रेल्वेचे मोठं जाळं असून देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही रेल्वेच्या माध्यमातून पोहचू शकता. परंतु रेल्वे प्रवास करत असताना भारतीय रेल्वे विभागाने काही नियम (Indian Railways Rules) बनवले आहेत. त्या नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला कारवाईला सामोरे क्जव लागू शकतं. रेल्वे मधून प्रवास करत असताना कोणत्या वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भारतीय रेल्वेच्या मुख्य नियमांनुसार, रेल्वे प्रवासादरम्यान स्टोव्ह, गॅस सिलिंडर, आग लागणाऱ्या वस्तू, फटाके, ऍसिड, सिगारेट ग्रीस इत्यादी साहित्य तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. याशिवाय जर रेल्वे मध्ये कोणी प्रवासी दारू घेऊन अथवा दारू पिऊन गेला तरी तो अडचणीत येऊ शकतो. असं केल्यास रेल्वे कायदा 1989 च्या कलम 165 अंतर्गत सदर प्रवाशांवर कारवाई करण्यात येते. दारू शिवाय इतर सुद्धा कोणताही मादक पदार्थ घेऊन तुम्ही रेल्वे प्रवास करू शकत नाही. Indian Railways Rules
जर ट्रेनमधून तुम्हाला कोणता पाळीव प्राणी घेऊन जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा रेल्वे विभागाचे वेगळे नियम आहेत. रेल्वे मधून घोडा किंवा बकरी असे काही ठरविक प्राणीच नेण्यास परवानगी आहे. तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर घेऊन जाऊ इच्छित असाल तर रेल्वेच्या माध्यमातून घेऊन जाऊ शकत नाही. फक्त आपत्कालीन परिस्थितीतच तुम्हाला गॅस सिलिंडर नेण्याची मुभा मिळू शकते.
सुक्का नारळ घेऊन जाऊ शकत नाही – Indian Railways Rules
आणखी एक गोष्ट म्हणजे रेल्वे प्रवास करत असताना तुम्ही सुकलेला नारळ घेऊ शकत नाही. सुकलेल्या नारळाचा बाहेरचा भाग ज्वलनशील मानला जातो. या भागातून आगीचा धोका वाढतो. त्यामुळे हे फळ रेल्वेत नेण्यास मनाई आहे.रेल्वे प्रवासादरम्यान जय वस्तू घेऊन जाण्याची मुभा नाही त्या वस्तू घेऊन प्रवास केल्यास सदर प्रवाशावर कारवाईचा अधिकार रेल्वे विभागाला आहे. त्यानुसार, एक हजार रुपये दंड, तीन वर्षे कारावास किंवा दोन्ही शिक्षा सदर प्रवाशाला होऊ शकतात