काश्मीरच्या कुलगाममध्ये उडालेल्या चकमकीत १ दहशतवादी ठार, २ जवान जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर । जम्मू-काश्मीरच्या दररोज कोणत्या-ना-कोणत्या भागात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमकी उडत आहेत. भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोर्चा खोलला आहे. शनिवारीही काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत भारतीय जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केल्याचे समजते. तर दोन जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सुरक्षा दलाचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू होते. यावेळी दहशतवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केले. मात्र, या चकमकीत दोन सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले. विशेष म्हणजे, गेल्या दिवसांपासून सुरक्षा दलाच्या जवानांनी काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांविरूद्ध मोहीम सुरू केली आहे. शनिवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी राजौरी जिल्ह्यातील थानमंडी भागातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. तसेच, दहशतवाद्यांच्या या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला.

गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीर पोलिसांनी डोडा जिल्हा पूर्णपणे दहशतवाद्यांपासून मुक्त घोषित केला होता. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते जून दरम्यान 118 दहशतवाद्यांना ठार केले आहे. तर जूनमध्येच सुरक्षा दलांनी 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment