Indian Spices Used In Treatment Of Cancer | कर्करोगाच्या उपचारात भारतीय मसाल्यांचा झाला प्रभावी परिणाम, IIT मद्रासच्या संशोधकांनी मांडले मत

Indian Spices Used In Treatment Of Cancer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Spices Used In Treatment Of Cancer | आपल्या भारतीय जेवणात मसाल्यांना खूप जास्त महत्त्व आहे. आपल्याकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले बनतात आणि या मसाल्यामुळे त्या पदार्थाची एक वेगळी अशी ओळख निर्माण होत असते. मसाल्यामुळे जेवणाची चव वाढते. त्याचप्रमाणे खाणाऱ्याला देखील काहीतरी वेगळे खाण्याचा आनंद मिळतो. परंतु तुम्हाला माहित आहे का? असे अनेक मसाले आहेत, जे कर्करोगा सारख्या आजारावर कायमचा इलाज करू शकतात. कदाचित हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे अगदी खरे आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटी मंत्रालय मद्रास येथील संशोधकांनी भारतीय मसाल्यांच्या वापराचे पेटंट घेतले आहे. यानुसार कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराच्या उपचारावर हे भारतीय मसाले प्रभाव करू शकतात. आपण मसाल्यांचा वापर करून औषधी गुणधर्म असलेले औषधे 2018 पर्यंत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता असलेल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. भारतीय मसाल्यांमध्ये अनेक औषधी वनस्पतींचा समावेश असतो. त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी असतात.

आयआयटीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, भारतीय मसाल्यांपासून बनवलेल्या नॅनो औषधाचा स्तन, फुफ्फुस, कोलन, ग्रीवा, तोंडी आणि थायरॉईडमधील कर्करोगाच्या पेशंटवर चांगला परिणाम दिसून आलेला आहे. परंतु ही सगळी औषधे सामान्य पेशींमध्ये सुरक्षित आहे. त्यामुळे आता कर्करोगांसाठी बनवणारी औषधांसाठी सुरक्षा आणि किंमत ही त्यांच्या पुढील एक मोठे आव्हान आहे.

याबाबत ते म्हणाले की, प्राण्यांवर याबाबत यशस्वी अभ्यास करण्यात आलेला आहे. आता 2027 ते 2028 पर्यंत ही औषधे बाजारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने क्लीनिकल चाचण्यांचे नियोजन केले जात आहे.

भारतीय मसाले आरोग्यासाठी फायदेशीर | Indian Spices Used In Treatment Of Cancer

याबाबत माहिती देताना आयआयटी मद्रासच्या केमिकल इंजीनियरिंग विभागाचे प्राध्यापक आग नागराजन यांनी सांगितले की, भारतीय मसाले अनेक वर्षापासून आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु त्यांच्या जैवविविधतेमुळे त्यांचा उपयोग आणि वापर देखील मर्यादित आहे. परंतु नॅनो फॉर्मुला या मर्यादांवर मात करते. त्यामुळे त्यांची स्थिरता लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. हे सुद्धा आमच्या प्रयोग शाळेत आम्ही केलेले आहे. त्यामुळे भारतीय पदार्थ हे कर्करोगावर ती खूप प्रभावशाली आहे.