‘हिटमॅन’ रोहीत शर्माला ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा स्टार फलंदाज हिटमॅन रोहित शर्माला ‘खेलरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.रोहितच्या आगोदर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार विराट कोहली याना हा पुरस्कार भेटला आहे.

रोहित शर्माच्या नावावर 29 एकदिवसीय शतक आणि 4 T-20 शतकांची नोंद आहे. रोहित जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने एकदिवसीय क्रिकेट मध्ये 3 द्विशतक झळकावले आहेत.तसेच गेल्या वर्षी इंग्लंड मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रोहितने तब्बल 5 शतके झलकावली होती.त्यामुळेच खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्मा च्या नावाची शिफारस करण्यात आली होती.

पाहुयात रोहितचे काही विक्रम :

★ एकदिवसीय क्रिकेट मध्ये 3 वेळा द्विशतक झळकवणारा जगातील एकमेव फलंदाज

★एकाच विश्वचषक स्पर्धेत 5 शतक ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज

★एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वोच्च 264 धावा रोहितच्याच नावावर

★ एकाच वर्षी सर्वाधिक षटकार मारणार खेळाडू (2019 मध्ये 77 षटकार मारले )

★रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने निढास ट्रॉफी आणि आशिया चषक जिंकला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’