हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या सहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याने युक्रेन वर जोरदार हल्ला केला असून सर्वत्र गोळीबार आणि बॉम्ब हल्ल्याने युक्रेन हादरले आहे. याच दरम्यान, खारकीव शहरातील एका भारतीय विद्यार्थ्याचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
युक्रेन मधील खारकीव शहरात रशिया कडून सुरू असलेल्या गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, मी अत्यंत दुःखाने सांगत आहे की, खार्किव येथे झालेल्या हवाई हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सध्या मंत्रालय विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे..
Ministry of External Affairs says that an Indian student lost his life in shelling in Kharkiv, Ukraine this morning. The Ministry is in touch with his family. pic.twitter.com/EZpyc7mtL7
— ANI (@ANI) March 1, 2022
सदर विध्यार्थाचे नाव शेखरप्पा ग्यानगौडा नवीन असे असून तो एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. नवीन हा मूळचा चलागेरी, कर्नाटक राज्यातील विद्यार्थी आहे. दरम्यान, भारताचे परराष्ट्र सचिव रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांच्या संपर्कात आहेत. यामध्ये भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे…