मॉस्को । चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या या काळात भारतीय सैन्याने मॉस्को येथे विजय दिनाच्या परेडमध्ये सहभाग घेतला. यावेळी भारताच्या तिन्ही सैन्याची तुकडी सहभागी झाली. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे देखील रशियाच्या विजय दिन परेडमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत. रशियाच्या विजय दिन परेडच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विजय दिन परेडमध्ये भारताच्या 75 सैनिकांच्या तुकडीनेही भाग घेतला. यात भारताच्या तिन्ही संरक्षण दल लष्कर, नौदल, वायू दलाच्या सैनिकांचा समावेश होता.
Russia’s Victory Day Parade in Moscow. Raksha Mantri Shri @rajnathsingh is attending the function. pic.twitter.com/AEmuJ0g8PK
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) June 24, 2020
दरम्यान, लडाखमध्ये चीनबरोबर सीमा विवाद सुरू असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या तीन दिवसांच्या रशिया दौर्यावर आहेत. गेल्या तीन महिन्यात राजनाथ सिंह यांचा हा पहिला परदेश दौरा आहे. संरक्षणमंत्र्यांच्या या भेटीदरम्यान एस-400 अँटी क्षेपणास्त्र प्रणालीसह अनेक महत्त्वपूर्ण शस्त्रे भारताला मिळतील अशी अपेक्षा आहे. राजनाथ सिंह यांच्या या भेटीदरम्यान रशियाबरोबर सुरू असलेल्या कराराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Attending the Victory Day Parade at Red Square in Moscow today to commemorate the 75th Anniversary of Victory of the Soviet People in the great Patriotic War of 1941-1945.
I am proud that a Tri-Service contingent of the Indian Armed Forces is also participating in this parade. pic.twitter.com/0zBiaKH5r1
— Rajnath Singh (@rajnathsingh) June 24, 2020
भारत रशियाबरोबर शस्त्रास्त्र कराराची लवकर वितरण करण्याची मागणी करू शकेल, ज्यात लढाऊ विमान, टँक आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. रशियाबरोबर शस्त्रे करारामध्ये सर्वात महत्त्वाची एस-400 संरक्षण यंत्रणा आहे. डिसेंबर 2021 पर्यंत भारताला एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा मिळणार होती, परंतु कोविड -१९ मुळे त्याला विलंब होत आहे. याशिवाय सुखोई ३० एम आणि टी-९० टँक देखील लवकरात लवकर देण्याची मागणीही भारत करू शकतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”