7 नंबरची जर्सी रिटायर करा!! यष्टीरक्षक दिनेश कार्तिकची BCCI ला विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली.धोनीच्या निवृत्तीची बातमी समजताच त्याच्या संघातील सहकाऱ्यांनी, राजकीय नेत्यांनी तसेच बॉलीवूड कलाकारांनी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनेही धोनीसोबतचा फोटो पोस्ट करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धोनीसोबत आतापर्यंत अनेक चांगल्या आठवणी माझ्या नेहमी लक्षात राहतील. तसेच मला आशा आहे की बीसीसीआय त्याची 7 नंबरची जर्सी कायमस्वरुपी रिटायर करेल.अस यावेळी दिनेश कार्तिक म्हणाला.

याआधी सचिन च्या निवृत्ती नंतरही बीसीसीआयने 10 नंबरची जर्सी कायमस्वरुपी रिटायर केली होती. त्यात पद्धतीने धोनीची जर्सीही रिटायर करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.